पुढारी वृत्तसेवा
मेकअपशिवाय सुंदर दिसणे अगदी शक्य आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या त्वचेची आणि जीवनशैलीची थोडी काळजी घेण्याची गरज आहे.
दिवसातून दोनदा चेहरा चांगल्या फेस वॉशने स्वच्छ धुवा आणि त्यानंतर मॉइश्चरायझर नक्की लावा. यामुळे त्वचा मऊ राहते.
दररोज किमान ७ ते ८ तास झोप घ्या. पुरेशी झोप घेतल्याने चेहरा टवटवीत आणि चमकदार दिसतो.
तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, हंगामी फळे, कोशिंबीर आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करा.
दिवसभरातून किमान ८ ते १० ग्लास पाणी प्या. पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते.
जर तुम्ही तुमच्या त्वचेचे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण केले, तर तुम्ही विना मेकअपही सुंदर दिसाल. बाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर करा.
लिप बाम आणि आय क्रीमचा वापर करा. मऊ ओठ आणि टवटवीत डोळे तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य अधिक वाढवतात.
सौंदर्य फक्त चेहऱ्यावर नसते, तर ते तुमच्या आत्मविश्वासातून आणि हास्यातून झळकते. त्यामुळे नेहमी आनंदी राहा.