टेन्शन फ्री राहायचंय? दिनचर्येत करा ‘हे’ बदल

Shambhuraj Pachindre

नेहमी हसतमुख जगा. हसल्‍यामुळे तुमच्‍या शरीरात डोपामाईन संप्रेरकाला चालना मिळते. या संप्रेरकामुळे शरीराला नवं काही तरी करण्‍याची प्रेरणा मिळते. त्‍यामुळे रोजच्‍या जगण्‍याला तुम्‍ही हसतमुख सामोरे जा. 

नियमित व्यायामामुळे तणाव, चिंतेची भावना आणि नैराश्याची लक्षणे कमी होण्यास मदत होते. शारीरिक हालचालींचा समावेश रोजच्‍या दिनचर्येत करा.

आपल्‍या दिनचर्येत विश्रांतीचा अभाव असेल तर शरीराला मोठी किंमत चुकवावी लागते. त्‍यामुळे शांत झोपेसाठी वेळ राखून ठेवा. निद्रानाशवर उपचार घ्‍या. 

तुमच्‍या आहाराचा शरीरावर परिणाम होतो तसा तो मनावरही होत असतो. त्‍यामुळे तुमचा आहार संतुलित ठेवा. 

तुम्‍ही तुमच्‍या दिवसाची सुरुवात ही कृतज्ञतेने करा. म्‍हणजे सर्वांचे आभार माना. या छोट्या सकारात्‍मक कृतीने तुमचे मूडवर लक्षणीय परिणाम होतो. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here