Brain Health Tips: तुमच्या मेंदूला सतत थकवा जाणवतोय का? मग 'या' ६ गोष्टींकडे लक्ष द्या
पुढारी वृत्तसेवा
तुमचा मेंदू सतत थकल्यासारखा वाटतोय का? चुकीच्या सवयींमुळे मेंदूचे मोठे नुकसान होऊ शकते.
Brain | file photo
हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनानुसार, मेंदू तल्लख ठेवण्यासाठी या काही रंजक आणि महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.
Brain sharp | file photo
मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी ७ ते ८ तासांची सलग झोप आवश्यक आहे. झोपेमुळे मेंदूला विश्रांती मिळून नवीन पेशी तयार होतात, ज्यामुळे स्मरणशक्ती वाढते आणि अल्झायमरसारख्या आजारांचा धोका कमी होतो.
Sleep Tips | file photo
रात्रभराच्या उपवासानंतर मेंदूला ऊर्जेची गरज असते. नाश्ता टाळल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊन मेंदूवर परिणाम होतो. नियमित नाश्ता तुम्हाला दिवसभर सक्रिय आणि ताजेतवाने ठेवतो.
poha breakfast
मेंदूचा ७५% भाग पाण्याने बनलेला असतो. शरीरात पाणी कमी झाल्यास तार्किक विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. दिवसातून किमान २ लिटर पाणी प्यायल्याने मेंदूच्या ऊती हायड्रेटेड आणि कार्यक्षम राहतात.
Brain | file photo
प्रत्येक गोष्टीसाठी इंटरनेटवर अवलंबून राहिल्याने मेंदूचा नैसर्गिक व्यायाम थांबला आहे. छोट्या आकडेमोडी, फोन नंबर लक्षात ठेवणे आणि वाचन यामुळे मेंदूची विचारशक्ती आणि स्मरणशक्ती दीर्घकाळ तंदुरुस्त राहते.
social media | Pudhari
३० मिनिटांपेक्षा जास्त काळ मोठ्या आवाजात हेडफोन वापरणे टाळा. श्रवणशक्ती कमी झाल्याचा थेट परिणाम मेंदूच्या ऊतींवर होतो, ज्यामुळे भविष्यात मेंदूचे गंभीर विकार उद्भवू शकतात.
नकारात्मक विचार तणाव आणि नैराश्य वाढवतात. याउलट, "मी मजबूत आहे" हा एक सकारात्मक विचार तुमच्या मानसिक आरोग्याला बळकट करतो. सकारात्मक राहा आणि आपल्या मेंदूला ताजेतवाने ठेवा!
मेंदू हा निसर्गाचा अनमोल आविष्कार आहे. आजच तुमच्या जीवनशैलीत हे छोटे बदल करा आणि मेंदूचे आरोग्य जपा!