उन्हाळ्यात 'डिहायड्रेशन' टाळा, पाणी पिताना 'या' टिप्स फॉलो करा
Shambhuraj Pachindre
तुम्ही कामानिमित्त घराबाहेर असाल तर शरीरातील पाणी संतुलन कायम ठेवण्यासाठी पाण्याची बाटली नेहमी सोबत बाळगणे हा सर्वात सोपा मार्ग आहे.
जेवण करण्याच्या ३० ते ४५ मिनिटे आधी एक ग्लास पाणी पिणे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. दिवसभरात तुम्ही पाणी पिण्याची वेळ वेळ ठरवा.
तुमच्या दिवसाची सुरुवात तुम्ही पाणी पिऊन करा. उन्हाळ्याच्या दिवसात शक्य असल्यास तुम्ही नारळ पाण्यानेही सुरुवात करू शकता.
‘पाणी पिण्याची योग्य वेळ कधी आहे? असा प्रश्न अनेकांना असतो. जेवण करण्यापूर्वी, जेवण दरम्यान अल्प आणि जेवण झाल्यावर एक ते दीड तासांनी पाणी प्यायल्याने अन्नाचे पचन चांगले होते.
नेहमी पाणी पिण्याचा कंटाळा आला असेल तर उन्हाळ्यात लिंबू, अननस, आंबा तसेच आले आणि पुदिन्याची पाने यांसारखी ताजी आणि हंगामी फळांचा रसाचे सेवन करुन तुम्ही डिहायड्रेशनचा त्रास कमी करु शकता.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.