पुढारी वृत्तसेवा
सिल्क साडी नेसणे प्रत्येक महिलेला आवडते. ही साडी केवळ सौंदर्य वाढवत नाही, तर आपल्या भारतीय संस्कृतीची सुंदर छाप सोडते.
जर तुम्ही सिल्क साडी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही काही मिनिटांतच खरी आणि बनावट सिल्क साडी ओळखू शकता.
साडीच्या कडेचा एक छोटा धागा काढून तो जाळून पहा. जर धागा जळताना केस जळल्यासारखा वास आला आणि त्याची काळी राख झाली, तर ते सिल्क खरे आहे.
खरे सिल्क हाताच्या तळहातावर धरून थोडे घासल्यास त्यात हलकी उष्णता जाणवते. खऱ्या सिल्क मधील नॅचरल फायबरमुळे घासल्यावर ते गरम होते.
आपल्या हातातील अंगठी काढून त्यातून साडी पार करण्याचा प्रयत्न करा. खरे सिल्क इतके मऊ आणि लवचिक असते की ते लहानशा अंगठीतूनही सहज बाहेर पडते.
बनावट सिल्क साडीला एकसारखीच पांढरट चमक असते. परंतु, खऱ्या सिल्कची चमक वेगळी असते; तुम्ही वेगवेगळ्या कोनातून पाहिल्यास खऱ्या सिल्कचा रंग किंचित बदलताना दिसतो.
सिल्क साड्यांवर बहुधा जरीचे काम असते. खऱ्या जरीमध्ये चांदी किंवा सोन्याच्या बारीक तारांचा वापर केलेला असतो. हे ओळखण्यासाठी साडी उलट बाजूने तपासून पहा.
जर कोणी तुम्हाला खूप कमी किमतीत (उदा. १,००० किंवा १,५०० रुपयांत) प्युअर कांजीवरम किंवा बनारसी सिल्क देत असेल, तर ती साडी बनावट असण्याची शक्यता जास्त असते.
खरे सिल्क अत्यंत मऊ आणि मखमली लागते. याउलट बनावट सिल्क स्पर्शाला थोडे कडक किंवा प्लास्टिकसारखे जाणवते.