पैठणी साडी कशी ओळखायची? जाणून घ्या...

पुढारी वृत्तसेवा

पैठणी विणण्यावरून तिचे दोन प्रकार पडतात. एक हातमागावर विणलेली पैठणी तर दुसरी मशिनवर बनवलेली पैठणी.

आपल्याकडे एक पैठणी असावी अशी महाराष्ट्रातील प्रत्‍येक महिलेचं स्वप्न असतं.

बदलत्‍या काळात पैठणीतही डिझाईन्सचा ट्रेन्ड आला आहे. त्‍यामुळे फसवणूक टाळण्यासाठी फरक समजणे आवश्यक.

हातमागावर बनवलेल्या पैठणीचे धागे पदराच्या दोन्ही बाजूंनी सारखेच दिसतात. यात धागा कापला जात नाही.

दोन्ही बाजुंनी पैठणीची डिझाईन सारखीच असते. शिवाय धाग्यांमध्येही समानता असते. साडीची बॉर्डर आणि पदर सारखाच असतो.

खऱ्या पैठणीची जर कधी काळी पडत नाही. तर मशिनवर बनवलेल्या पैठणीचे धागे दोन्ही बाजूंनी वेगळे असतात. मशिनवर बनवल्यामुळे पदराच्या मागील बाजूने खुले झालेले असतात.

एक पैठणी तयार करण्यासाठी कारागिराला एक महिना लागू शकतो.

शुद्ध जर, रेशिम वापरामुळे 3 ते 4 पिढ्यांपर्यंत वापरता येते. पैठणी साड्यांची किंमत 10 हजारांपासून 2 लाखांपर्यंत जाउ शकते.