पुढारी वृत्तसेवा
जर तुम्ही घरात येणाऱ्या पालींमुळे त्रस्त झाला असाल आणि त्यांना घरातून बाहेर काढण्यासाठी एखादा उपाय शोधत असाल तर हा उपाय पाहा.
'तुळस' ही तुमच्यासाठी एक जादूई वनस्पती ठरू शकते.
तुळसच का?
तुळशीच्या रोपातून एक विशिष्ट प्रकारचा सुगंध येतो. हा सुगंध पालींना अजिबात आवडत नाही, ज्यामुळे त्या तुळशीच्या आसपास घुटमळत नाहीत.
तुळशीचे रोप कुठे ठेवावे?
तुम्ही तुमच्या घरातील बाल्कनी, खिडक्यांच्या जवळ किंवा मुख्य दरवाजाजवळ तुळशीचे रोप ठेवू शकता. यामुळे पाली घरात प्रवेश करणार नाहीत.
तुळशीच्या पानांचा वापर
तुम्ही तुळशीची पाने तोडून ती घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये देखील ठेवू शकता.
तुळशीचे पाणी
तुळशीची पाने पाण्यात टाकून ती चांगली उकळवून घ्या. त्यानंतर ते पाणी थंड झाल्यावर एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. हे तयार झालेले तुळशीच्या रसाचे पाणी घरात ज्या ठिकाणी पाली येतात तिथे स्प्रे करा.
टीप: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानावर आधारित आहे.