निलेश पोतदार
आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन मुलांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. मात्र, जास्त स्क्रीन टाइममुळे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक वाढीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
स्क्रीन टाइमसाठी वेळेची मर्यादा ठरवा
मुलांना सांगा की मोबाईलचा वापर फक्त अभ्यास, संशोधन किंवा मनोरंजनासाठी आणि ठराविक वेळेपुरताच करायचा आहे. दररोज एक निश्चित वेळ ठरवा, उदा. दिवसाला एक तास.
मुलांसाठी शारीरिक हालचाली वाढवा
मुलांना बाहेर खेळायला, धावायला आणि इतर शारीरिक उपक्रमांमध्ये सहभागी करा. यामुळे त्यांचे लक्ष मोबाईलकडून हटेल आणि ते शारीरिकदृष्ट्या निरोगी राहतील.
पुस्तके व इतर छंदांना प्रोत्साहन द्या
मुलांना पुस्तक वाचन, आर्ट अँड क्राफ्ट, संगीत किंवा इतर सर्जनशील उपक्रमांची आवड निर्माण करून द्या. यामुळे स्क्रीन टाइम कमी होईल आणि ते नवीन गोष्टी शिकतील.
मोबाईलऐवजी सकारात्मक पर्याय द्या
मुलांना बोर्ड गेम्स, पझल्स किंवा शैक्षणिक खेळणी द्या. यामुळे ते स्क्रीनशिवायही आनंद घेऊ शकतील. ग्रुप अॅक्टिव्हिटीज करा, जेणेकरून ते व्यस्त राहतील.
कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवा
कुटुंबासोबत वेळ घालवून मुलांना मोबाईलशिवायही आनंदी राहता येते हे शिकवा. त्यांच्याशी संवाद साधा, एकत्र जेवण करा आणि चर्चा करा. विकेंडला पिकनिक किंवा इतर आउटिंग्स ठरवा.
मोबाईलवरील कंटेंटवर नियंत्रण ठेवा
मुलं मोबाईलवर काय पाहत आहेत यावर लक्ष ठेवा. फक्त शैक्षणिक आणि सकारात्मक कंटेंटपर्यंतच प्रवेश द्या. पॅरेंटल कंट्रोल फीचर्स वापरा आणि अनावश्यक व हानिकारक अॅप्स काढून टाका.
स्वतः आदर्श ठरा
पालक म्हणून स्वतःही मोबाईलचा वापर मर्यादित ठेवा. मुलं पालकांचे अनुकरण करतात, त्यामुळे मोबाईलशिवायही आयुष्य आनंददायी असू शकते हे त्यांना दाखवून द्या.