स्वयंपाक ही एक कला असली तरी यातही होणारी कॉमन चूक म्हणजे भाजीत मीठ जास्त होणे .अगदी रोज स्वयंपाकाचा सराव असणाऱ्या व्यक्तीच्या हातून देखील अशी चूक कधीतरी घडतेच .अनेकदा सुक्या भाज्यांमध्ये मिठाचे प्रमाण जास्त होण्याची शक्यता असते .असे काही घडल्यास स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीसमोर प्रश्नचिन्ह उभे राहते .असे झाल्यास भाजीत 1 ते 2 चमचे भाजलेले बेसन घालून चांगले मिसळा. यामुळे खारटपणा कमी होण्यास मदत होते .याशिवाय बटाट्याचे काप भाजीत टाकल्यास ते जास्तीचे मीठ शोषून घेण्यास मदत करतात