पुढारी वृत्तसेवा
ओव्हल चेहरा जवळपास सर्व प्रकारच्या आयब्रोला शोभतो. हलक्या कमानीचा (Soft Angled) आकार चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलवतो.
गोल चेहरा अधिक लांब आणि सडपातळ दिसण्यासाठी उंच कमानीच्या (High Arch) आयब्रो उत्तम पर्याय ठरतात.
स्क्वेअर फेसमध्ये जबड्याची रेषा ठळक असते. त्यामुळे सॉफ्ट कर्व्ह असलेल्या आयब्रो चेहऱ्याचा समतोल राखतात.
कपाळ रुंद आणि हनुवटी निमुळती असल्यास हलक्या गोलाकार आयब्रो चेहऱ्याला संतुलित लूक देतात.
सरळ किंवा कमी कमानीच्या आयब्रोमुळे चेहरा कमी लांब आणि अधिक प्रमाणबद्ध दिसतो.
रुंद गालांची हाडे असलेल्या चेहऱ्यावर सॉफ्ट आर्च आयब्रो अतिशय आकर्षक दिसतात.
अतिशय बारीक आयब्रोमुळे चेहरा वयस्कर किंवा फिका दिसू शकतो. नैसर्गिक जाडी शक्यतो कायम ठेवा.
ट्रेंडमध्ये असलेला आयब्रो शेप प्रत्येकाला सूट होईलच असे नाही. चेहऱ्याचा आकार आणि नैसर्गिक आयब्रो लक्षात घेऊनच शेप निवडा.
पहिल्यांदाच आयब्रो शेप बदलत असाल तर अनुभवी ब्युटी एक्स्पर्टचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित ठरते