How to Count Money: पैसे कसे मोजावे? 'ही' पद्धत तुम्हाला बनवू शकते श्रीमंत

पुढारी वृत्तसेवा

प्रत्येकालाच वाटते की आपल्याकडे भरपूर पैसा असावा. यासाठी लोक दिवसरात्र मेहनत करतात. पण फक्त मेहनत करून चालत नाही!

आपल्याकडे पैशाला लक्ष्मी मानले जाते. त्यामुळे पैसे नेमके कसे मोजले जातात, यावरही आपल्याकडे पैसा टिकणार की नाही, हे अवलंबून असते असे मानले जाते.

प्रत्येकाची पैसे मोजण्याची शैली वेगवेगळी असते. काहीजण बंडल हातात धरून नोटा वर करत मोजतात, तर काहीजण बंडल पकडून एक-एक नोट बाजूला करत मोजतात, तर काहीजण टेबलावर किंवा पृष्ठभागावर नोटा ठेवून मोजतात.

"पैसे कसेही मोजले तरी काय फरक पडतो?" असा प्रश्न अनेकांना पडतो; पण वास्तुशास्त्र आणि जाणकारांच्या मते, पैसे मोजण्याच्या पद्धतीचा मोठा प्रभाव पडतो.

पैसे मोजण्याची योग्य पद्धत

तज्ज्ञांच्या मते, पैशांचे बंडल हातात धरून एक-एक नोट स्वतःच्या दिशेने वर करत मोजणे नेहमी उत्तम मानले जाते. मोठे व्यावसायिक किंवा सराफ कसे नोटा मोजतात हे पाहिलं तर लक्षात येईल.

पैसा तुमच्याकडे येईल

नोटा मोजताना अंगठा किंवा बोटांच्या साहाय्याने त्या स्वतःच्या दिशेने ओढून मोजाव्यात. याचा अर्थ लक्ष्मी म्हणजे पैसा आपल्याकडे आकर्षित होत आहे असा होतो.

पैसा दूर तर जात नाही ना?

जर तुम्ही पैसे मोजताना नोटा विरुद्ध दिशेने किंवा बंडलातून बाजूला सरकवत असाल, तर तो पैसा तुमच्यापासून दूर जात असल्याचे आणि उधळपट्टीचे प्रतीक मानले जाते.