Seeds And Nuts: 'शक्तीवर्धक' ड्रायफ्रुट्स खाण्याची योग्य पद्धत काय?

Anirudha Sankpal

बिया आणि सुका मेवा चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास त्याचा पूर्ण फायदा मिळत नाही.

अळशी (Flax Seeds)

अळशी नेहमी दळून खावी, अख्खी अळशी पचत नाही. दह्यात किंवा स्मूदीमध्ये १ चमचा दळलेली अळशी मिसळून खाणे सर्वोत्तम ठरते.

भोपळ्याच्या बिया (Pumpkin Seeds)

या बिया कच्च्या किंवा बिना तेलात भाजून खाव्यात. पचनाचा त्रास असल्यास ४-६ तास भिजवून सॅलड किंवा ओट्समध्ये घालून खाव्यात.

सूर्यफुलाच्या बिया (Sunflower Seeds)

या बिया मिठाशिवाय कच्च्या किंवा हलक्या भाजून खाव्यात. दही किंवा स्मूदीवर स्प्रिंकल करून याचे सेवन करावे.

चिआ सीड्स (Chia Seeds)

चिआ सीड्स कधीही सुके खाऊ नका, ते किमान २० मिनिटे पाण्यात भिजवूनच स्मूदी किंवा डिटॉक्स वॉटरमध्ये वापरावेत.

बदाम (Almonds):

रात्री ४-६ बदाम पाण्यात भिजत घालावेत आणि सकाळी त्याची साल काढूनच खावे, जेणेकरून त्यातील पोषक तत्वे नीट शोषली जातात.

अक्रोड (Walnuts)

दिवसाला १-२ अक्रोड रात्रभर पाण्यात भिजवून खाणे पचनासाठी आणि मेंदूच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते.

सेवनाची वेळ

बिया आणि सुका मेवा सकाळी रिकाम्या पोटी किंवा स्नॅक्स म्हणून खाल्ल्यास शरीराला सर्वाधिक ऊर्जा मिळते.

येथे क्लिक करा