Earbuds Cleaning : हेडफोन, इअरबडसमध्ये धूळ साचली आहे? या घरगुती वस्तूंनी करा स्वच्छ!

Namdev Gharal

मोबाईलबरोबर हेडफोन, इअरबडस् चा वापर खूप वाढला आहे. पण छोट्या उपकरणांमध्ये बारीक धुळ साचली जाते यामुळे आवाजात फरक पडतो

ही धूळ अगदी काळजीपूर्वक स्वच्छ करणे आवश्यक असते, यासाठी काही घरगुती वापरातील वस्तू उपयुक्त ठरतात त्‍या पाहू

मऊ टूथब्रशचा वापर: इअरबड्स किंवा हेडफोनच्या बारीक जाळीवर (Speaker Mesh) साचलेली सुकी धूळ काढण्यासाठी कोरड्या, मऊ केसांच्या टूथब्रशचा हलक्या हाताने वापर करा.

इअरबड/कॉटन स्वाब (Cotton Bud): बारीक कोपरे आणि चार्जिंग केसच्या आत साचलेली घाण स्वच्छ करण्यासाठी इअरबड्सचा वापर करा.

सिलिकॉन टिप्स वेगळे करून धुणे: नेकबँड किंवा इन-इअर बड्सचे रबरी सिलिकॉन कव्हर काढून कोमट पाण्यात थोडे लिक्विड सोप टाकून धुवा आणि पूर्ण वाळल्यावरच परत लावा.

चिकटपणा आणि जंतू दूर करण्यासाठी कापसावर किंवा मायक्रोफायबर कापडावर २-३ थेंब रबिंग आयसोप्रोपिल अल्कोहोल घेऊन बाहेरील भाग पुसून घ्या. (थेट द्रव स्पीकर्सवर टाकू नका).

चार्जिंग पॉइंट्सची स्वच्छता: नेकबँड किंवा इअरबड्सच्या केसचे मेटल चार्जिंग पॉइंट्स लाकडी टूथपिकने अगदी हळूवार साफ करा; लोखंडी टाचणी किंवा पिन वापरणे टाळा.

मायक्रोफायबर कापड: संपूर्ण वायर, हेडबँड आणि केस पुसण्यासाठी मऊ मायक्रोफायबर कापडाचा वापर करा, ज्यामुळे स्क्रॅचेस पडत नाहीत.

पाण्यापासून सावध राहा: कोणतेही गॅझेट थेट वाहत्या पाण्याखाली धरू नका किंवा जास्त ओल्या कापडाने पुसू नका, यामुळे अंतर्गत सर्किट खराब होऊ शकते.