Fan Cleaning Tips: घरातील फॅन साफ कसा करावा? वापरा 'ही' भन्नाट ट्रिक

पुढारी वृत्तसेवा

उन्हाळा सुरू झाला की आपण पंखे सुरू करतो, पण अनेक महिने बंद असल्यामुळे त्यावर धूळ आणि चिकट घाणीचा जाड थर जमा होतो.

जर पंखा साफ न करताच चालवला, तर ती सगळी धूळ पूर्ण खोलीत पसरते. त्यामुळे पंखा चालवण्यापूर्वी तो साफ करणे गरजेचे आहे.

अनेकांकडे पंख्यापर्यंत पोहोचण्यासाठी शिडी नसते, त्यामुळे तो साफ करणे कठीण जाते.

काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही शिडी किंवा जास्त मेहनत न घेता पंखा चमकवू शकता.

सफाईच्या ४ सोप्या पद्धती:

लांब दांडा असलेल्या डस्टरने तुम्ही खाली उभे राहूनच पंखा साफ करू शकता. पाणी, व्हिनेगर आणि डिटर्जंट यांचे मिश्रण करून त्यात डस्टर भिजवून पंख्याचे पाते पुसून घ्या.

लिंबू, बेकिंग सोडा आणि लिक्विड सोप यांचे द्रावण तयार करा. हे मिश्रण कापडाला लावून पाते पुसल्यास चिकटपणा आणि जुनी घाण लवकर निघते.

जुनी उशीची पिशवी: ही एक खूप प्रभावी पद्धत आहे. उशीची पिशवी पंख्याच्या पात्यामध्ये अडकवा आणि ती हळूहळू मागे ओढा. यामुळे सगळी धूळ पिशवीच्या आतच जमा होईल आणि जमिनीवर किंवा खोलीत पसरणार नाही.

तुमच्याकडे दुसरे काही साधन नसेल, तर साध्या जुन्या कापडानेही पाते बाहेरच्या दिशेने पुसून तुम्ही धूळ साफ करू शकता.

पंखा साफ करण्यापूर्वी त्याचे बटण नक्की बंद करा, जेणेकरून सुरक्षितपणे काम करता येईल.