पुढारी वृत्तसेवा
तुम्हालाही तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे आवडते का? तसे असल्यास, ही माहिती तुमच्यासाठीच आहे.
तांब्याची भांडी लवकर काळवंडतात. त्यामुळे, ती वेळच्या वेळी स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी टीप्स जाणून घ्या.
१. पीठ आणि व्हिनेगर
एका वाटीमध्ये थोडे गव्हाचे पीठ घ्या आणि त्यात थोडे व्हिनेगर मिसळून पेस्ट तयार करा.
या मिश्रणाने तांब्याची भांडी घासून स्वच्छ करा, भांडी अगदी चमकायला लागतील.
२. मीठ आणि लिंबू
एक लिंबू आणि एक चमचा मीठ घ्या.
लिंबू कापून ते मिठाच्या पाण्यात (किंवा लिंबावर मीठ लावून) १० मिनिटांसाठी तसेच ठेवा. त्यानंतर याने भांडी घासून साफ करा.
३. मीठ आणि व्हिनेगर
मीठ आणि व्हिनेगर एकत्र करून एक मिश्रण तयार करा.
या मिश्रणामध्ये तांब्याची भांडी १० मिनिटे भिजवून ठेवा. त्यानंतर भांडी बाहेर काढून व्यवस्थित घासून घ्या, काळेपणा निघून जाईल.
४. पीठ, हळद आणि लिंबू
गव्हाचे पीठ, हळद आणि लिंबाचा रस एकत्र करून एक घट्ट पेस्ट तयार करा.
ही पेस्ट तांब्याच्या भांड्याला आतून आणि बाहेरून व्यवस्थित लावा आणि ५ ते १० मिनिटांसाठी तशीच राहू द्या. त्यानंतर भांडी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.