Matka Clean Tips | मातीचे मडके हात घालून धुवू नये: स्वच्छ करण्याची योग्य पद्धत कोणती?

पुढारी वृत्तसेवा

बाजारातून मातीचे मडके आणल्यानंतर स्वच्छ करताना चुकीची पद्धत वापरली जाते, मडक्याला आत हात घालून धुतला जातो

नव्याने आणलेल्या मडक्याला कसे धुतले जाते याचा त्याच्या टिकाऊपणावर, पाण्याच्या गुणवत्तेवर आणि स्वच्छतेवर मोठा परिणाम होतो

नवीन मातीचे मडके आतून खूप नाजूक असते. मातीपासून बनलेले असल्यामुळे आतील बाजू गुळगुळीत नसते, तर त्यात लहान-लहान छिद्रे (पोरस) असतात

ही छिद्रे पाणी थंड ठेवण्यास मदत करतात, मडक्याच्या आत हात घालून जोराने घासले, तर आतील भागात सूक्ष्म भेगा पडून रचना खराब होऊ शकते

हातांवर तेल, साबण किंवा मळाचे अंश असू शकतात. माती छिद्रयुक्त असल्यामुळे हे पदार्थ त्यात शोषले जातात आणि पाण्यात मिसळतात

नवीन मडके स्वच्छ पाण्याने बाहेरून आणि आतून नीट धुवा. पाण्याने भरून काही तास पाणी भरून तसेच ठेवा. त्यामुळे आतल्या सैल मातीचे कण निघून जातील

आतून घासण्याऐवजी हलक्या हाताने पाणी फिरवा. भिजवून झाल्यानंतर पाणी काढून टाका आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवा. वाळल्यानंतरच पिण्याचे पाणी भरा

नवीन मडके साबण किंवा डिटर्जंटने स्वच्छ केल्यास माती हे पदार्थ शोषून घेते आणि त्यामुळे पाण्याची चव खराब होते

धूळ आणि घाण टाळण्यासाठी मडके झाकून ठेवा. धुणे, भिजवणे आणि हात आत न घालणे यामुळे टिकाऊपणा आणि पाण्याची गुणवत्ता चांगली राहण्यास मदत होते

येथे क्लिक करा