Iron Clean: इस्त्रीवर कपडे जळून काळे पडलेले डाग घालवण्यासाठी सर्वात सोपी ट्रिक

पुढारी वृत्तसेवा

कपडे प्रेस करताना कधी-कधी कापड जळते आणि त्याचे अवशेष इस्त्रीच्या तळाशी चिकटतात. त्यामुळे काळे डाग तयार होतात.

जळालेल्या इस्त्रीने इतर स्वच्छ कपडे प्रेस केल्यास त्यांनाही डाग लागू शकतात. त्यामुळे इस्त्री नियमित स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे.

उपाय : १) साधे मीठ

स्वयंपाकघरातील साधे मीठ इस्त्रीवरील काळा थर काढण्यासाठी खूप प्रभावी ठरते.

लाकडी पृष्ठभागावर मीठ पसरवा. इस्त्री थोडी गरम करून बंद करा आणि ती मीठावर २-३ मिनिटे हलक्या दाबाने फिरवा.

नंतर स्वच्छ सूती कापडाने इस्त्री पुसा. काळे डाग निघून इस्त्री नव्यासारखी चमकू लागेल.

२) टूथपेस्ट

इस्त्रीवर खूप जुने डाग असतील तर पांढरी टूथपेस्ट उपयोगी पडू शकते.

जळालेल्या भागावर टूथपेस्ट लावा. इस्त्री थोडी गरम झाल्यावर बंद करा आणि जुन्या कापडाने प्लेट घासून स्वच्छ करा.

टूथपेस्टमुळे जळालेल्या थरावरची घाण सैल होते आणि डाग सहज निघून जातात.

३) बेकिंग सोडा

बेकिंग सोडा केवळ स्वयंपाकासाठीच नाही तर धातूच्या पृष्ठभागावरील डाग साफ करण्यासाठीही प्रभावी आहे.

बेकिंग सोड्यात थोडे पाणी मिसळून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट इस्त्रीच्या प्लेटवर लावा.

ओल्या कापडाने हलक्या हाताने घासून पेस्ट साफ करा. काळेपणा निघून जाईल आणि इस्त्री पुन्हा चकाचक दिसेल.