पुढारी वृत्तसेवा
काही सोप्या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही बाजारातून आणलेली हळद शुद्ध आहे की त्यात भेसळ आहे, हे सहजरीत्या ओळखू शकता.
पाण्याची चाचणी घ्या
एका ग्लास पाण्यात एक चमचा हळद टाका आणि त्याला न हलवता काही मिनिटे तशीच राहू द्या.
जर हळद शुद्ध असेल, तर ती हळूहळू ग्लासच्या तळाशी जाऊन बसेल आणि पाण्याचा रंग खूप जास्त पिवळा होणार नाही.
हातावर चोळून पाहा
थोडीशी हळद तळहातावर घेऊन चोळून पाहा.
असली हळदीचा सुवास हलका आणि नैसर्गिक असतो. जर हळद बनावट किंवा रसायने मिसळलेली असेल, तर तिचा डार्क रंग हातावर पटकन चिकटून राहतो.
आयोडीन चाचणी
पद्धत: हळदीमध्ये आयोडीनचे काही थेंब टाका.
जर हळदीचा रंग निळा किंवा जांभळा झाला, तर त्या हळदीमध्ये 'स्टार्च' ची भेसळ केलेली असू शकते.
जास्त चमकदार रंग असल्यास काळजी घ्या
अत्यंत गडद किंवा जास्त पिवळा-चमकदार रंग असलेली हळद अनेकदा भेसळयुक्त असू शकते. शुद्ध आणि नैसर्गिक हळदीचा रंग थोडा फिकट/साधा आणि नॅचरल दिसतो.
भेसळीपासून वाचण्यासाठी अनेक लोक बाजारातून तयार हळद पूड विकत घेण्याऐवजी अख्खी हळकुंडे आणून ती घरी किंवा गिरणीतून दळून घेतात. यामुळे भेसळ होण्याची शक्यता संपते.