पुढारी वृत्तसेवा
फावरे - लेयुबा (Favre - Leuba)
१८८५ भारतीय हातातील कला ओळखुन फ्रिट्ज फावरे भारतात आला आणि फावरे - लेयुबा नावाचा ब्रँड सुरु केला. यांचे घड्याळ भारतातील प्रत्येक हवामाना साठी उत्तम असल्याने ब्रिटिश ऑफिसरांची भारतीय इलाइट ची पहिली पसंती हिच झाली.
फावरे - लेयुबा पॉकेट वॉच
फावरे - लेयुबा ला भारतीय बाजार आणि ब्रिटिश ऑफिसर आणि भारतीय इलाइट ची पसंती मुळे त्यांचे पॉकेट वॉच एक स्टेटस म्हणुन वापरले जाऊ तागले.
पोलो मैंदानात घडला इतिहास
१९३१ साली कोलकत्ताच्या पोलो मैदानात ब्रिटिश ऑफिसरांना त्यांच्या युरोपीयन घड्याळा सोबत पोलो खेळनं अवघड जायला लागला. तेव्हा त्याच मैंदानावर स्पोर्ट वॉच ची कल्पना उदयाला आली आणि त्यातुन निर्माण झाला रिवर्सो वॉच (Reverso Watch).
राजेशाही घराण्याची अनोखी पसंती
फक्त ब्रिटिश ऑफिसरच नाही भारतातील राजेशाही घराण्याची सुध्दा घड्याळाची आवड होती. याचच उदाहरण म्हणजे भुपिंदर सिंग महाराजांनी स्विस फ्रान्स च पॉकेट वॉच विकत घेतल होत ज्याची किंमत त्याकाळी 867,166.24$ (7,73,26,167.50 रुपये आताची किंमत) इतकी होती.
द मेड इन इंडिया
१९६१ मध्ये हिंदुस्तान मशिन टुल्स (HMT) ने इतिहास घडवला. भारताच पहिल मेड इन इंडिया घड्याळ बनवून ज्याच नाव होत जनता.
ऑलविन क्वॉर्ट्ज
१९७० च्या दशकात ऑलविन या हैदराबादी कंपनीने क्वॉर्ट्ज (Quartz) घड्याळाची निर्मिती केली. ज्यांची किंमत कमी होती. हे घड्याळ मुख्यता त्यांच्या साठी बनविले ज्यांनी घड्याळ कधीच वापरले नव्हते.
भारतीय वेळेचा नवीन चेहरा
१९८० च्या दशकात पुन्हा एक बदल झाला. टाटाने टायटन क्वॉर्ट्ज नावाचा ब्रँड ची सुरुवात केली. भारतातील बदल आणि नवी पिढिची मागणी मुळे टायटन ने HMT ला मागे टाकले.
स्विस वॉच (Swiss Watch)
१९९१ साली परदेशी गुंतवणुकी साठी भारतीय बाजार खुला झाला. तेव्हा स्विच वॉचने भारतात देवनागरी लिपी मध्ये घड्याळ आणलं.
फास्टट्रॅक न्यू एरा
२००० च्या दशकात टायटन ने सब-ब्रँड सुरु केले. फास्टट्रॅक हा त्याचाच एक ब्रँड. नवीन पिढिचा स्टाईलिश ब्रँड म्हणुन त्याची ओळख निर्माण झाली.