पुढारी वृत्तसेवा
घरात वापरल्या जाणाऱ्या डास पळवणाऱ्या लिक्विडमुळे लहान मुलांना गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
19 महिन्यांच्या बालकाची घटना
लिक्विड रीफिलमधील द्रव चुकून पिल्याने एका बालकाला रुग्णालयात दाखल करावे लागले.
लिक्विड का ठरू शकतो धोकादायक?
रसायन शरीरात गेल्यास फुफ्फुसांमध्ये सूज, श्वास घेण्यास त्रास आणि संसर्ग होऊ शकतो.
तज्ज्ञांचा इशारा
फुफ्फुसांपर्यंत रसायन पोहोचल्यास केमिकल न्यूमोनायटिस सारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
उपकरणांची नियमित तपासणी करा
रीफिल, झाकण किंवा उपकरणात गळती, सैल भाग किंवा तुटलेले घटक असल्यास त्वरित बदल करा.
लहान मुलांमध्ये धोका अधिक
18 महिने ते 3 वर्षे वयोगटातील मुले वस्तू तोंडात घालून पाहतात, त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते.
सुरक्षिततेसाठी काय करावे?
रीफिल आणि उपकरणे नेहमी मुलांच्या आवाक्याबाहेर व बंद कपाटात ठेवा.
मुलाने लिक्विड पिल्यास काय कराल?
जबरदस्तीने उलटी करू नका. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक असल्यास रुग्णालयात जा.
जागरूकता हाच सर्वोत्तम बचाव
घरातील साधे दिसणारे केमिकल उत्पादनेही धोकादायक ठरू शकतात; योग्य साठवण आणि काळजी अत्यंत महत्त्वाची आहे.