Namdev Gharal
रात्रीच्या वेळी रोडवरुन प्रवास करताना एक गोष्ट प्रक्रर्षाने जाणवते ती म्हणजे रोड रिफ्लेक्टर, चालकांना रस्त्याचा अंदाज यावा यासाठी हे खूप महत्वाचे ठरतात. यांना कॅट आय (Cat's Eyes) ही म्हटले जाते.
पण या रोड रिफ्लेक्टर्सनां विज पुरवठा असतो किंवा सोलर पॅनलही नसता मग हे चमकतात कसे. शहरात काही ठिकाणी बॅटरीवाले रिफ्लेक्टर्स असतात. याला आपण रेडियम म्हणतो पण ते रेडियम नसते.
या साठी एक भौतिक शास्त्राचा कमालीचा नियम उपयोगात येतो तो म्हणजे प्रकाश परावर्तन Light Reflection
त्यासाठी प्रतिगामी परावर्तन Retro-reflection या तंत्राज्ञानाचा वापर हे म्हणजे ज्या बाजूकडून प्रकाश आला आहे त्याच बाजूला प्रकाश परावर्तीत करणे. यासाठी या रिफ्लेक्टर्समध्ये विशेष वस्तूंचा वापर केला जातो
म्हणजे तुमच्या गाडीचा प्रकाश रिफ्लेक्टरवर पडला की, तो थेट तुमच्याच डोळ्यांकडे परत येतो, ज्यामुळे तो भाग चमकताना दिसतो.
एक अनेक रिफ्लेक्टर्समध्ये बारीक काचेचे गोल मणी Glass Beads असतात. जेव्हा प्रकाश या मण्यांवर पडतो, तेव्हा तो मण्यांच्या आतून वाकून (Refraction) मागील पृष्ठभागाला धडकतो आणि पुन्हा समोरच्या दिशेला फेकला जातो.
दुसरा प्रकार म्हणजे प्रिझम (Prisms): काही रिफ्लेक्टर्समध्ये प्लास्टिकचे त्रिकोणी आकार (Prisms) असतात. हे प्रिझम प्रकाशाला काटकोनात परावर्तित करून परत पाठवतात.
अजून एक प्रकारच्या रिफ्लेक्टरच्या आतल्या बाजूला चांदीचा किंवा अल्युमिनियमचा पातळ लेप (Coating) असतो. जेव्हा प्रकाश काच किंवा प्लास्टिकमधून आत शिरतो, तेव्हा हा लेप त्याला बाहेर जाण्यापासून रोखतो आणि आरशासारखा मागे ढकलतो.
या रिफ्लेक्टर्सचा शोध पर्सी शॉ (Percy Shaw) यांनी लावला त्यांच्या लक्षात आले की मांजराच्या डोळ्यावर प्रकाश पडला की ते चमकतात यातून त्यांना या रिफ्लेक्टर्सची कल्पना सुचली म्हणून याला कॅट आईज म्हटले जाते.
रिफ्लेक्टर्स स्वतः प्रकाश निर्माण करत नाहीत, तर ते तुमच्या वाहनाच्या हेडलाईटचा प्रकाश परावर्तीत करतात जोपर्यंत तुमच्या वाहनाचा दिवा चालू आहे, तोपर्यंत हे रिफ्लेक्टर्स चमकत राहतील.