Petrol Making | पेट्रोल कसे तयार होते ? क्रूड ऑईलपासून इतर कोणते पदार्थ मिळतात

पुढारी वृत्तसेवा

आपल्या रोजच्या आयुष्यातील भाग म्हणजे पेट्रोल पूर्ण जग सध्या पेट्रोलवर चालते पण तुम्हाला माहिती आहे का पेट्रोल कसे तयार होते जाणून घेऊया

पेट्रोल डिझेल किवां इतर जे इंधन आहे या क्रूड ऑइलपासून तयार केले जाते. काय आहे प्रोसेस जाणून घेऊ

समुद्राच्या तळाशी किंवा जमिनीखाली गाडल्या गेलेल्या लाखो वर्षांपूर्वीच्या सेंद्रिय पदार्थांपासून (जीवाश्म) तयार झालेल्या 'क्रूड ऑइल' स्वरूपात असते

हे कच्चे तेल बाहेर काढून पाइपलाईनद्वारे किंवा टँकरव्दोर रिफायनरी (Refinery) मध्ये पाठवले जाते

फ्रॅक्शनल डिस्टिलेशन (Fractional Distillation): रिफायनरीमध्ये मोठ्या टॉवरमध्ये कच्चे तेल खूप उच्च तापमानाला गरम केले जाते

तापमानानुसार विलगीकरण: जसे जसे तेल गरम होते, तसतसे त्यातील घटक वेगवेगळ्या तापमानाला वाफेच्या रूपात बाहेर पडतात

हे तेल साधारण ४०० अंश सेल्सिअस तापमानाला गरम केले जाते, जोपर्यंत त्याचे वाफेत रूपांतर होत नाही

साधारण 400 अंश तापमानाच्या दरम्यान वाफेचे रूपांतर होऊन जे द्रव मिळते, त्याला प्रक्रिया करून 'पेट्रोल' म्हणून साठवले जाते.

शेवटच्या टप्प्यात पेट्रोलमधील सल्फरसारखी अशुद्ध द्रव्ये काढून टाकली जातात. त्यानंतर ते पेट्रोल पंपावर विक्रीसाठी पाठवले जाते.

यानंतर क्रुड ऑईल पासून डिझेल, LPG, केरोसिन, जेट फ्युएल, Paraffin Wax व शेवटी डांबर हे अनेक उपपदार्थ तयार होतात.

शेवटी राहणाऱ्या पेट्रोकेमिकल्स पासून प्लास्टिक, कृत्रिम रबर पेन्टस, कपडे यांच्यासाठी वापर होतो