Meat diet guidelines: मटण आठवड्यातून किती वेळा खावे? नवीन हेल्थ रिपोर्ट

पुढारी वृत्तसेवा

दशकांपासून आपल्याला सांगितले जाते की, तूप, लोणी आणि लाल मांस आरोग्याचे शत्रू आहेत.

पण २०२६ मध्ये अमेरिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालाने सर्वांनाच धक्का दिला आहे.

अमेरिकेच्या नवीन '२०२५-२०३० डायटरी गाईडलाईन्स' नुसार, तूप किंवा लाल मांसापेक्षा 'प्रक्रिया केलेले अन्न' आणि 'जास्त साखर' हे आरोग्यासाठी खरे धोके आहेत.

व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत अमेरिकेचे आरोग्य सचिव रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांनी सांगितले की, अंडी, लाल मांस आणि डेअरी उत्पादने उच्च दर्जाच्या प्रथिनांचा चांगला स्रोत आहेत.

हा बदल भारतीयांसाठी देखील महत्त्वाचा आहे, कारण आपल्याकडे डाळी, दूध, दही, तूप, पनीर, अंडी आणि लाल मांस पूर्वीपासूनच आहाराचा भाग आहेत.

तज्ज्ञांच्या मते, लाल मांस मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास हृदयविकाराचा थेट धोका नसतो. पण, त्याचे अतिसेवन मात्र 'बॅड कोलेस्ट्रॉल' वाढवू शकते.

पद्मविभूषण डॉ. पुरुषोत्तम लाल यांच्या मते, भारतीय आहार आधीच समृद्ध आहे. आपल्यासाठी लाल मांस खाणे आवश्यक मानले जात नाही, पण ते मर्यादित प्रमाणात खाणे सुरक्षित आहे.

डॉक्टरांच्या मते, जर तुम्ही मटण खात असाल, तर ते आठवड्यातून फक्त एकदा किंवा १०-१५ दिवसांतून एकदा खाणे आरोग्यासाठी सर्वात उत्तम ठरते.

पाश्चिमात्य लोकांनी आठवड्याला ५०० ग्रॅम लाल मांस खाणे हे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आहे. मात्र, भारतीयांनी यापेक्षा कमी संतृप्त चरबीचे सेवन करावे.

कारण, भारतीय आहारात कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. अशात लाल मांस जास्त सेवन केल्यास कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.