Sleep Health Tips : वयानुसार किती झोप आवश्यक आहे?

पुढारी वृत्तसेवा

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी झोपेची गरज वेगवेगळी असते.

शरीराची झीज भरून काढण्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी पुरेशी झोप घेणे अनिवार्य आहे.

नवजात बालकांना सर्वात जास्त झोपेची गरज असते. त्यांच्या शारीरिक विकासासाठी दिवसातील 14 ते 17 तास झोप आवश्यक मानली जाते.

1 ते 2 वर्षे वयोगटातील मुलांना 11 ते 14 तासांच्या झोपेची गरज असते.

तर 3 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांना 10 ते 13 तास झोप मिळणे गरजेचे आहे.

शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी (6-13 वर्षे) 9 ते 11 तास आणि किशोरवयीन मुलांसाठी (14-17 वर्षे) 8 ते 10 तास झोप पुरेशी असते.

काम करणाऱ्या आणि तरुण पिढीसाठी किमान 7 ते 9 तास झोप घेणे आवश्यक आहे.

तर वयोवृद्ध व्यक्तींना साधारणपणे 7 ते 8 तास झोपेची गरज असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.