Hair Care: केस धुताना शॅम्पू किती वेळा वापरावा?

पुढारी वृत्तसेवा

केस धुताना दोनदा शॅम्पूचा वापर करणे आवश्यक आहे का?

तज्ज्ञांच्या मते, पहिल्यांदा शॅम्पू लावल्याने केसांवरील धूळ, घाम, प्रदूषण आणि वरवरचे तेल निघून जाण्यास मदत होते.

तर, दुसऱ्यांदा शॅम्पू लावल्याने शॅम्पूमधील सक्रिय घटक केसांच्या मुळांपर्यंत पोहोचतात आणि टाळू खोलवर स्वच्छ होते.

कोणासाठी आहे फायदेशीर?

1. ही पद्धत सर्वांसाठी नसून विशिष्ट लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते:

2. ज्यांची टाळू अत्यंत तेलकट आहे.

3. ज्यांच्या केसांमध्ये कोंडा आहे.

4. जे लोक रोज प्रदूषणात वावरतात किंवा हेअर स्टायलिंग उत्पादनांचा (जेल, स्प्रे) वापर करतात.

5. नियमित व्यायाम करणारे लोक, ज्यांना जास्त घाम येतो.

तोटेही लक्षात घ्या!

प्रत्येक वेळी केस दोनदा धुण्यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल निघून जाऊ शकते.

यामुळे केस कोरडे आणि राठ होऊ शकतात.

केसांची टोके दुभंगणे किंवा केस तुटण्याचे प्रमाण वाढू शकते.

टाळूची त्वचा संवेदनशील होऊन खाज सुटू शकते.

तेलकट त्वचा असेल तर आठवड्यातून २ ते ३ वेळा दोनदा शॅम्पूने धुवा आणि सामान्य त्वचा असल्यास आठवड्यातून एकदा किंवा जेव्हा केसांना खूप घाण लागली असेल तेव्हाच धुवा.