पुढारी वृत्तसेवा
वजन कमी करण्यासाठी आहाराचे नियोजन करताना चपाती आणि भाताचे योग्य प्रमाण माहिती असणे आवश्यक आहे.
वजन घटवण्यासाठी रोज १८०० ते २००० कॅलरीज आणि २२५ ते ३२५ ग्रॅम कार्ब्सचे संतुलन राखणे गरजेचे असते.
एका सामान्य आकाराच्या चपातीतून शरीराला सुमारे १५ ग्रॅम कार्ब्स आणि ७० कॅलरीज मिळतात.
वजन कमी करायचे असल्यास महिलांनी दिवसभरात जास्तीत जास्त ३ ते ४ लहान पोळ्या खाव्यात.
पुरुष दिवसभरात ५ ते ६ पोळ्या खाऊनही योग्य व्यायामाच्या मदतीने वजन सहज कमी करू शकतात.
डाएट करताना भात आवडत असल्यास दिवसाला फक्त १ लहान वाटी भात खावा; जास्त भात खाल्ल्याने वजन घटण्याची गती मंदावते.
पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन किंवा ब्लॅक राइस खा. यातील कॉम्प्लेक्स कार्ब्स आणि फायबरमुळे पोट बराच वेळ भरलेले राहते.
एका वेळच्या जेवणात चपाती आणि भात एकत्र खाणे टाळा; दोघांपैकी एकाच घटकाची निवड करा.
साध्या गव्हाच्या पिठाऐवजी मल्टीग्रेन पीठ वापरा आणि ताटात डाळ, भाजी, सूप व सॅलडचे प्रमाण वाढवा.
आहारात लिक्विड व सॅलड वाढवा आणि जेवण झाल्यावर लगेच न बसता ३० मिनिटे चालायला जा; यामुळे वजन वेगाने कमी होईल.