Interesting Facts: भारतीय नोटेवर नक्की किती भाषा असतात? जाणून घ्या रंजक माहिती

पुढारी वृत्तसेवा

आजच्या डिजिटल युगात जरी ऑनलाईन पेमेंटचे प्रमाण वाढले असले, तरी चलनी नोटांचे महत्त्व आजही टिकून आहे.

दैनंदिन व्यवहारात आपण अनेक नोटा वापरतो, मात्र त्यावर नेमक्या किती आणि कोणत्या भाषा असतात, याची माहिती अनेकांना नसते.

भारतात १ रुपयाची नोट वगळता इतर सर्व मूल्यांच्या नोटा भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) जारी केल्या जातात. १ रुपयाच्या नोटेवर मात्र भारत सरकारच्या वित्त सचिवांची स्वाक्षरी असते.

भारतीय चलनी नोटेवर एकूण १७ भाषांमध्ये नोटेचे मूल्य लिहिलेले असते.

भारतीय संविधानाने मान्यता दिलेल्या प्रमुख भाषांना नोटेवर स्थान देण्यात आले आहे. याची रचना पुढीलप्रमाणे असते...

नोटेच्या दर्शनी भागावर हिंदी आणि इंग्रजी अशा २ भाषा प्रामुख्याने दिसतात.

नोटेच्या मागील बाजूस (Back): एका चौकटीमध्ये इतर १५ प्रादेशिक भाषा छापलेल्या असतात.

नोटेच्या मागील बाजूच्या पॅनलमध्ये मराठी, गुजराती, आसामी, बंगाली, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मल्याळम, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू आणि उर्दू या १५ भाषांचा समावेश असतो.

कोणत्याही भारतीय नोटेच्या (उदा. १०० किंवा ५०० रुपये) मागील बाजूस नजर टाकल्यास, त्या नोटेची किंमत या विविध भाषांमध्ये लिहिलेली आपल्याला पाहायला मिळते. ही विविधता भारताच्या 'विविधतेतून एकता' या संस्कृतीचे दर्शन घडवते.

येथे क्‍लिक करा.