Hunger Strike: माणूस किती दिवस उपोषण करू शकतो... आरोग्य कधी धोक्यात येते?

Anirudha Sankpal

ऊर्जेचा स्रोत

उपोषण सुरू असताना अन्नाचा पुरवठा बंद झाल्यावर शरीर आधी लिव्हरमधील साठवलेल्या ग्लायकोजनचा आणि त्यानंतर ऊर्जेसाठी फॅट (चरबी) चा वापर करते.

स्नायूंचे क्षय

शरीरातील फॅट संपल्यानंतर ऊर्जा मिळवण्यासाठी शरीर स्वतःच्या स्नायूंचे आणि उतींचे (tissues) विघटन करू लागते, ज्यामुळे वजन वेगाने घटते.

पाण्याचे महत्त्व

व्यक्ती केवळ पाण्यावर अवलंबून असेल, तर परिस्थिती अधिक गंभीर होते; मात्र ओआरएस किंवा ज्यूससारखे लिक्विड घेतल्यास शरीराला काही प्रमाणात पोषण मिळते.

जगण्याची मर्यादा

जर एखादी व्यक्ती केवळ स्वच्छ पाणी पीत असेल, तर एक निरोगी व्यक्ती साधारण ३ महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ जिवंत राहू शकते.

आरोग्यविषयक धोके

अन्नावाचून शरीरातील साखरेची पातळी (शुगर लेव्हल) आणि रक्तदाब (बीपी) धोकादायक पातळीपर्यंत खालावू शकतात, जी एक मेडिकल इमर्जन्सी असते.

सोडियमची कमतरता

शरीरात सोडियम कमी झाल्याने मेंदूला ऊर्जा मिळत नाही, परिणामी ब्लड प्रेशर ९०/६० mmHg च्या खाली गेल्याने जीवघेणी स्थिती निर्माण होऊ शकते.

वैयक्तिक फरक

व्यक्तीचे वय, वजन, आधीचे आजार आणि शरीर उपोषणाला किती सरावलेले आहे, यावर जगण्याची नेमकी कालावधी अवलंबून असते.

वैद्यकीय निरीक्षण

उपोषणाच्या १५ दिवसानंतर शरीराची स्थिती बिघडण्याची शक्यता असते, त्यामुळे अशा काळात तज्ज्ञ डॉक्टरांच्या नियमित देखरेखीची नितांत गरज असते.

येथे क्लिक करा