Namdev Gharal
आपण दिवाळीमध्ये जे फटाके फोडतो ते मोठा आवाज आणि प्रकाश यांचा धमाका करते, हे तयार करण्यामागे रसायनशात्र आणि यांत्रिकीकरणाचे अचूक मिश्रण आहे.
फटाक्याचा इतिहास पाहता तांग राजवंशाच्या काळात, चीनमधील इसवीसन इ.स. ६०० ते ९०० दरम्यान रसयनांचा अभ्यास करणाऱ्यांनी गन पावडर शोधून काढली.
आवाज करणाऱ्या फटाक्यामध्ये पुढीलप्रमाणे मुख्य घटक असतात, यामध्ये इंधन (Fuel): कोळसा (Charcoal) किंवा गंधक (Sulfur) — हे घटक जळण्यासाठी ऊर्जा पुरवतात. पोटॅशियम नायट्रेट ($KNO_3$), पोटॅशियम क्लोरेट हे आगीला ऑक्सिजन पुरवतात
रंग उडवणाऱ्या फटाक्यात लाल रंग स्ट्रॉन्शिअम (Strontium), हिरवा रंग बेरियम (Barium) पिवळा रंग: सोडियम (Sodium) निळा रंग: तांबे (Copper) ॲल्युमिनियम किंवा मॅग्नेशियम पावडर व दारुत लपेटलेली वात असते
फटाका तयार करताना पहिल्यांदा जाड क्राफ्ट पेपर किंवा पुठ्ठा डिंकाच्या साहाय्याने घट्ट गुंडाळून कागदी नळी (Tube) तयार केली जाते
नळीचे खालचे टोक माती किंवा घट्ट कागदाने सील केले जाते, जेणेकरून विस्फोट एकाच दिशेने किंवा योग्य दाबाने होईल.
रसायनांचे मिश्रण (Chemical Blending): अत्यंत खबरदारी घेऊन ऑक्सिडायझर, इंधन आणि इतर घटक ठरावीक प्रमाणात मिसळले जातात, प्रत्येक फटाक्यानुसार मिश्रणाचे प्रमाण बदलते
भुईचक्र, अनार किंवा आकाशात फुटणाऱ्या रॉकेटसाठी रसायनांच्या छोट्या-छोट्या गोळ्या (ज्यांना 'Stars' म्हणतात) बनवून उन्हात वाळवल्या जातात. व त्या नंतर कागदी नळीत भरल्या जातात
लवंगी फटाके किंवा तोट्यांसारख्या फटाक्यांमध्ये मध्यभागी योग्य दाबाने पावडर भरली जाते व वात लावणे (Fusing):नळीच्या वरच्या भागात वात बसवली जाते आणि तिचे एक टोक मिश्रणाच्या थेट संपर्कात ठेवले जाते,
सील करणे आणि दोरा बांधणे :वरचे टोक घट्ट बंद करून सील केले जाते.आवाजाच्या मोठ्या फटाक्यांवर ( ॲटम बॉम्ब किंवा सुतळी बॉम्ब) वरून तागाचा दोरा (सुतळी) अत्यंत घट्ट गुंडाळला जातो.
फटाके सुरक्षित तापमानात नैसर्गिक हवेत आणि सूर्यप्रकाशात पूर्णपणे वाळवले जातात (ओलावा राहिल्यास फटाका फुसका ठरतो).शेवटी त्यावर आकर्षक लेबल लावून सुरक्षित पॅकिंग केले जाते.