पुढारी वृत्तसेवा
एका अभ्यासानुसार जगभरातील सर्व कुत्री ही युरोपातील प्राचीन लांडग्यांपासून 20,000 ते 40,000 वर्षांपूर्वी विकसित झाली.
पण सर्वात मोठा प्रश्न असा की, हा प्राणी माणसांच्या इतका जवळ आला कसा?
प्राचीन काळातील माणसे शिकारीसाठी वापरण्यासाठी कमी आक्रमक स्वभावाच्या लांडग्यांची पिल्ले पकडून त्यांना वाढवू लागले. कालांतराने या लांडग्यांनी जंगलातील सवयी विसरल्या आणि माणसांसोबत मिसळू लागले.
शिकारीत मदत, सुरक्षेची भावना आणि सोबत! हळूहळू हे नातं अधिक घट्ट होत गेलं.
काही निर्भय लांडगे मानवी वस्तीच्या जवळ उरलेलं अन्न खाण्यासाठी येऊ लागले. यात दोघांचाही फायदा झाला. लांडग्यांना अन्न आणि माणसांना चौकशीसारखी सुरक्षा. मग हळूहळू जे लांडगे माणसांपासून कमी घाबरायचे तेच टिकून राहिले.
हाच नैसर्गिक निवडीचा परिणाम म्हणजे कुत्र्यांची पहिली पिढी जन्माला आली.
प्रा. लार्सन सांगतात की, कुत्र्यांनी खास चेहऱ्याच्या स्नायूंची रचना विकसित केली, ज्यामुळे ती लहान मुलांसारखी निरागस, गोंडस अभिव्यक्ती करू शकतात.
2019 मधील संशोधनानुसार त्यांच्या डोळ्यांवर असलेले विशेष स्नायू मानवी मन समजून घेण्यसाठी जैविकरीत्या विकसित झालेली आहे.
दुसऱ्या एका संशोधनानुसार, कुत्र्यांच्या मेंदूमधील ‘पॉझिटिव्ह इमोशन’चा भाग सर्वात जास्त सक्रिय होतो, जेव्हा त्यांना आपल्या ओळखीच्या माणसाचासुगंध मिळतो.
म्हणजे हे नातं केवळ प्रेम नाही तर एकमेकांना खोलवर जाणून घेण्याची, अनुभूती घेण्याची क्षमता आहे.