पुढारी वृत्तसेवा
आपण जेव्हा खात असतो, तेव्हा आपल्या शरीरातील विविध संकेत एकत्र येऊन आपलं पोट भरल्याचा संदेश आपल्या मेंदूला देतात.
यात आपल्या आतड्यांमधून स्रवणारे हार्मोन्स आणि मेटाबोलाईटस् (ऊर्जा निर्माण करण्यासाठी अन्नाचे विघटन करणारे रेणू) यांचा समावेश असतो.
हे हार्मोन्स आपल्या स्वादुपिंडातून इन्सुलिन स्रवण्यासाठीही सिग्नल देतात.
इन्सुलिन आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम करते.
या संपूर्ण प्रक्रियेला ‘सटायटी कॅस्केड’ म्हणजे जेवणाच्या ‘तृप्तीच्या भावनेचा पॅटर्न’ असे म्हणतात. हे सिग्नल आपल्या आतड्यांच्या वेगवेगळ्या भागांमधून येतात.
आतडे आणि स्वादुपिंडामधून स्रवणाऱ्या हार्मोन्सचा हा पॅटर्न आणि त्यातून मेंदूला सिग्नल पाठवले जाणे याचा भरपेट जेवल्यानंतर आपल्याला येणाऱ्या सुस्तीशी संबंध असू शकतो.
या सुस्तीला ‘पोस्टप्रँडियल सोम्नोलेन्स’ म्हणजे जेवणानंतर येणारी सुस्ती असे म्हणतात.
मात्र ही सुस्तीची क्रिया नेमकी कशी होते याचे आकलन अद्याप चांगल्या प्रकारे झालेले नाही, असे तज्ज्ञ सांगतात.