Pigeon milk: कबुतर चोचीद्वारे पिल्लांना दूध कसे पाजते?

पुढारी वृत्तसेवा

निसर्गाने वेगवेगळ्या जीवांना त्यांच्या पिल्लांच्या गरजेनुसार काही क्षमता दिल्या आहेत.

सस्तन प्राण्यांमध्ये पिल्लांच्या जन्मानंतर मादीच्या शरीरात दूध तयार होते आणि पिल्ले स्तनातून दूध पितात. मात्र पक्ष्यांच्या जगात परिस्थिती थोडी वेगळी आहे.

कधी कबुतराचे निरीक्षण केल्यास त्याच्या शरीरावर स्तन दिसत नाहीत. तरीही कबूतर पिल्लांना सुरुवातीच्या दिवसांत एक विशेष प्रकारचा पौष्टिक पदार्थ खाऊ घालते, ज्याला 'कबुतराचे दूध' असे म्हटले जाते.

त्याला स्तनच नसतील तर त्याच्या शरीरात हे दुधासारखे पदार्थ तयार कुठे होते ? ते पिल्लांपर्यंत कसे पोहोचते? आणि ते फक्त मादी कबूतरच तयार करते का?

कबुतरांमध्ये याला 'क्रॉप मिल्क' म्हटले जाते. हा पदार्थ कबुतराच्या पचनसंस्थेतील 'क्रॉप' या भागाच्या आतील आवरणातून तयार होतो.

स्तन नसताना पिल्ले हे 'दूध' पितात तरी कसे ?

याची पद्धतही अनोखी आहे. कबूतर चोचीच्या मदतीने पिल्लांना क्रॉप मिल्क खाऊ घालते. आई किंवा वडील कबूतर तोंडातून पिल्लाला हा पोषक पदार्थ पोहोचवतात.

पिल्लू चोचीने आई-वडिलांच्या चोचीला स्पर्श करून हा पदार्थ ग्रहण करते.