Penguin Diet : पेंग्विन आपले पोट भरतात तरी कसे!

पुढारी वृत्तसेवा

अतिश्य सुंदर असणारे पेंग्विन हे अंटार्क्टिका तसेच आजूबाजूच्या बर्फाळ प्रदेशात राहतात.

शून्यापेक्षा कमी तापमान, बर्फाच्छादित समुद्र, जोरदार वारे, जिकडे पाहावे तिकडे सर्वत्र बर्फच अशा स्थितीतही पेंग्विन आपले पोट भरतात तरी कसे, हा एक कुतूहलाचा विषय म्हणावा लागेल.

बर्फाळ जमिनीवर पेंग्विन राहात असले तरी त्यांचा मुख्य अन्नस्रोत समुद्रात आहे. ते मासे, लहान कोळंबीसारखे प्राणी खातात.

अंटार्क्टिकामध्ये असणारे पेंग्विन विशेषतः लहान कोळंबी खातात.

सहसा पेंग्विन हे गटाने शिकार करतात. खोल समुद्रात जाऊन गटागटाने माशांना वेढतात अन्‌‍ त्यांना वर ढकलतात, जिथे मासे अडकतात.

या युक्तीने त्यांना अगदी कमी श्रमात शिकार मिळून मुबलक अन्नही मिळते. पेंग्विनचे शरीर थंडीतही अनुकूल असते.

ब्लरचा जाड थर त्यांच्या शरीरावर असतो. हा थर त्यांना ऊर्जा देतो तसेच उबदार ठेवतो. यामुळे त्यांना दिवसभरात जेव्हा अन्नाची कमतरता भासते तेव्हा ही चरबी त्यांना उपयोगाला येते.

एकूणच परिस्थिती कशीही असो, त्यामध्ये अगदी आरामात जगावे, असाच संदेश जणू पेंग्विन देतात, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.