Namdev Gharal
आपल्याकडे जुन्या काळापासून एक समजूत चालत आलेली आहे ती म्हणजे घरात पाल चुकचुकली की काही तरी संकट येणार, पण हे खरे आहे का, काय आहे यापाठीमागची कहाणी
शुभ की अशुभ? : घरात पाल चुकचुकणे हे केवळ नैसर्गिक लक्षण नसून त्यामागे अनेक धार्मिक आणि पारंपारिक समजुती जोडलेल्या आहेत.
ऐतिहासिक काळापासून लोक निसर्गातील बदलांवरून भविष्य वर्तवत असत. पालीच्या ओरडण्यामागे काही ठराविक कारणे दिली जातात
काही संकल्पनांच्या मते जुन्या काळी असे मानले जात असे की, पाल चुकचुकून घरातील माणसांना येणाऱ्या संकटाची पूर्वसूचना देते
पण याच्या उलट काही ठिकाणी मानले जाते की, पाल चुकचुकल्याने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते व नाश पावते
अनेकांचा असा विश्वास आहे की जर तुम्ही एखादी महत्त्वाची गोष्ट बोलत असाल आणि पाल चुकचुकली, तर तुम्ही बोलत असलेली गोष्ट 'सत्य' होणार आहे. म्हणूनच लोक 'कृष्ण-कृष्ण' किंवा 'राम-राम' म्हणत त्या घटनेचा आदर करतात.
वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिला तर असे लक्षात येते की पाल ओरडणे किंवा चुकचुकणे हा त्यांचा एकमेकांशी संपर्क साधण्याचा मार्ग आहे (विशेषतः मिलन काळात किंवा क्षेत्र निश्चित करताना)
तर काही संकल्पनानुसर पूर्व दिशेला पाल चुकचुकणे शुभ बातमी मिळण्याचे लक्षण आहे, तर रात्रीच्यावेळी पाल चुकचुकल्यास प्रवासाचे योग असल्याचे मानतात
भारतीय संस्कृतीत पालीला महालक्ष्मीचे रूप मानले जाते. 'पाल' हा शब्द 'पालन' करण्याशी संबंधित जोडला जातो
शकुन शास्त्रानुसार, जर पाल योग्य वेळी आणि योग्य दिशेला चुकचुकली, तर ते धनप्राप्तीचे संकेत मानले जातात
अंगावर पाल पडणे हे देखील शुभ-अशुभ फलांशी जोडले जाते. डोक्यावर पाल पडल्यास मानसन्मान वाढतो, तर उजव्या हातावर पडल्यास धनलाभ होतो असे मानले जाते.
तर पाल चुकचुकने हे संकटाची चाहूल न मानता इशारा किंवा सत्याची बाजू असे अनेक ठिकाण मानले जाते हे लक्षात येते