Horseshoe Crab |45 कोटी वर्षांपासून न बदललेला 'हॉर्स शू‘ खेकडा

Namdev Gharal

जगात एक असा खेकडा आहे की जो गेली 45 कोटी वर्षे झाले बदललेला नाही. जसा आहे तसा राहिला आहे. याचा आकार घोड्याच्या टापेसारखा असतो.

याअर्थी डायनासोरचा ज्यावेळी जन्म आला नाही तेव्हा पासून हा जीव समुद्रात रहिवास करत आहे.

वैशिष्ट्ये म्हणजे या खेकड्याच्या शरीररचनेत कोणताही बदल झालेला नाही. जीवशास्त्राच्या दृष्टीने याच्या नावात खेकडा असला तरी तो विंचू किंवा कोळी यांच्या शरीराशी साधर्म्य साधाणार असतो.

हॉर्सशू क्रॅबचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे निळे रक्त. त्याच्या रक्तामध्ये (Limulus Amebocyte Lysate) नावाचा एक घटक असतो, जो कोणत्याही बॅक्टेरियाला ओळखण्यात अत्यंत वेगवान असतो.

जगातील कोणत्याही लसीची (Vaccine) किंवा वैद्यकीय उपकरणांची तपासणी करण्यासाठी याच रक्ताचा वापर केला जातो. कोरोनाची लस तपासण्यासाठी देखील या जीवाचे रक्त महत्त्वाचे ठरले होते.

या जीवाला एकूण १० डोळे असतात, जे शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर असतात. हे याचे एक वैशिष्ट्ये आहे

हे जीव जमिनीवर काही काळ श्वास न घेता राहू शकतात, जोपर्यंत त्यांचे कल्ले (Gills) ओले आहेत तोपर्यंत त्‍यांना श्वास घेण्यात अडथळा येत नाही

हॉर्सशू क्रॅबची रचना निसर्गाने इतकी परिपूर्ण बनवली आहे की, त्याला बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची गरजच भासली नाही.

त्याचे कठीण कवच त्याला शत्रूंपासून वाचवते आणि कोणत्याही परिस्थितीत जगण्याची त्याची क्षमता अफाट आहे.

आज औषध उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात या जीवांचे रक्त काढले जाते. जरी त्यांना रक्त काढून पुन्हा समुद्रात सोडले जात असले, तरी मानवी हस्तक्षेपामुळे त्यांची संख्या कमी होत आहे.