Honey Histroy : सुमारे ८ हजार वर्षापासून माणसाला लागली मधाची गोडी!

Namdev Gharal

मधमाशीपासून मिळणार मध हा आज प्रत्‍येक घरात वापरला जातो, औषधांपासून खाण्यांपर्यंत अनेक उपयोग मधाचे केले जाते पण मधाचा शोध माणसाला जवळपास ८ हजार वर्षापूर्वी लागला.

स्पेनमधील व्हॅलेन्सिया जवळील 'कुएव्हा दे ला अराण्या' येथील गुहेत सुमारे ८,००० वर्षांपूर्वीच्या भित्तीचित्रात एक माणूस दोरीच्या साहाय्याने झाडावर चढून मधाचे पोळे काढताना दिसतो.

भारतातील मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील पाषाणयुगीन गुहाचित्रांमध्येही आदिमानव झाडावरून मध गोळा करताना दाखवला आहे. ही चित्रे साधारण ५,००० ते ८,००० वर्षे जुनी आहेत.

तुर्की आणि उत्तर आफ्रिकेमध्ये सापडलेल्या मातीच्या भांड्यांच्या अवशेषांवर शास्त्रज्ञांना मेणाचे रासायनिक अंश (beeswax ) सापडले आहेत, जे सुमारे ८ ते ९ वर्षांपूर्वी मानवाने मध आणि मेणाचा अन्न व साठवणुकीसाठी वापर केल्याचे सिद्ध करतात.

मानवाने जंगलातील मधाची पोळे काढून कृत्रिमरीत्या मधमाश्या पाळण्याची सुरुवात प्राचीन इजिप्तमध्ये सुमारे ४,५०० वर्षांपूर्वी (इ.स. पूर्व २४००) केल्याचे पुरावे आढळतात.

इजिप्शियन लोक मातीच्या नळकांड्यासारख्या पोळ्यांमध्ये मधमाश्या पाळत, तसेच मध खाण्याव्यतिरिक्त औषध, सौंदर्यप्रसाधने आणि मृतदेहांचे जतन (ममी) करण्यासाठी मधाचा वापर करत.

प्राचीन ग्रीक आणि रोमन लोक मधाला एक दैवी देणगी मानत असत. ग्रीक खेळाडू स्पर्धांपूर्वी ऊर्जेसाठी मध आणि पाण्याचे मिश्रण सेवन करत असत.

ॲरिस्टॉटलने त्याच्या 'हिस्टोरिया ॲनिमलियम' या ग्रंथात मधमाशीच्या वर्तनावर आणि पोळ्याच्या रचनेवर सविस्तर निरीक्षणे नोंदवली आहेत.

तर हिप्पोक्रेट्ससारखे वैद्य भाजलेल्या जखमा, घसादुखी आणि जंतुसंसर्ग झालेल्या जखमांवर उपचार करण्यासाठी मधाचा वापर करत असत.

ग्रीक पौराणिक कथांमध्ये, मध - ज्याला कधीकधी अमृत म्हटले जाते - हे ऑलिंपियन देवतांचे अन्न होते, हा पदार्थ त्यांना अमरत्व आणि शहाणपणा देतो असे मानले जात होते

जंगली मधमाशांच्या पोळ्या शोधणे, पोळी काढणे आणि गोड पदार्थांचा वापर करणे. मधमाशी पालन करणे हे हजारो वर्षांपासून मानव हे करत होते हे अनेक पुराव्यावरुन सिद्ध झाले आहे.