Honey Badger vs Black Mamba| अतिजहाल विष असलेला ब्लॅक मांबा जरी चावला तरी हनी बॅजर का मरत नाही!

Namdev Gharal

ब्लॅक मांबा हा आफ्रिकेत आढळणारा अतिशय वेगवान व अतिजहाल साप याचा जर जोरात दंश झाला तर माणूस १५ ते २० मिनिटात मरु शकतो पण हाच जर हनी बॅजरला चावला तर तो मरत नाही

ब्लॅक मांबा विषामध्ये प्रामुख्याने अल्फा-न्यूरोटॉक्सिन असतात. हे विष मज्जासंस्थेतील निकोटिनिक ॲसिटिलकोलीन रिसेप्टर्स (nAChRs) ला चिकटून स्नायू आणि मेंदूमधील संपर्क तोडते, ज्यामुळे श्वासोच्छ्वास थांबून पक्षाघात किंवा मृत्यू होतो.

पण हनी बॅजरवर याचा कोणताही परिणाम होत नाही कारण उत्क्रांतीदरम्यान हनी बॅजरच्या डीएनए मधील या रिसेप्टर्समध्ये विशिष्ट म्युटेशन (बदल) झाले आहेत. यामुळे विषातील विषारी प्रथिने त्यांच्या पेशींच्या रिसेप्टर्सला चिकटूच शकत नाहीत;

हनी बॅजरची त्वचा सुमारे ६ मिलिमीटर (पाव इंच) पर्यंत जाड आणि चामड्यासारखी रबरी असते. व त्वचा सैल असल्याने साप चावला तरी शरीराला फार मोठी दुखापत होत नाही.

सापाचे विषारी दात (Fangs) सहसा या जाड कातडीला पूर्णपणे भेदून स्नायूंमध्ये किंवा रक्तप्रवाहात खोलवर पोहोचू शकत नाहीत.

पण तरीही विषाचे प्रमाण जास्त झाले तर हनी बॅजर काही काळासाठी कोमात किंवा बेशुद्धावस्थेत जातो.

काही तास (सहसा २ ते ४ तास) बेशुद्ध राहिल्यानंतर त्याचे यकृत (Liver) आणि रोगप्रतिकारक शक्ती त्या विषाचा प्रभाव निष्प्रभ करते.

शुद्धीवर आल्यावर तो पुन्हा उठतो आणि बऱ्याचदा त्याच सापाला खाऊन टाकतो. कोमात असल्यावर त्‍याचे इतर अवयव काम करत नाहीत

हनी बॅजर मुंगूस आणि उदमांजरे या कुळातील एक सस्तन प्राणी आहे. आकाराने लहान असूनही त्याच्या आक्रमक, निडर आणि बेधडक स्वभावामुळे त्याला ‘जंगलातील गुंड’ (Thug of the Jungle) म्हटले जाते.

'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'नेही त्याला अधिकृतपणे "Most Fearless Creature in the World" म्हणून नोंदवले आहे.