अनेकदा बाजारातून आणलेलं पनीर भेसळयुक्त असण्याची शक्यता जास्त असते .घरच्या घरी सॉफ्ट सॉफ्ट आणि शुद्ध तेही अगदी सहज आणि कमी वेळात पनीर बनवणे शक्य आहे.घरगुती पनीर तयार करण्यासाठी एक लिटर फुलफॅट दूध , लिंबाचा रस किंवा व्हिनेगर – 2 टेबलस्पून, सूती कपडा, 1-2 कप थंड पाणी घ्या .हे मिश्रण सतत ढवळत राहा. दूध फाटू लागेल आणि त्यात पनीर आणि पाणी वेगवेगळ दिसू लागेल..दूध पूर्ण फाटेल तेव्हा गॅस बंद करून लगेच त्यात थोडे थोडे थंड पाणी घाला. यामुळे पनीरचा आंबटपणा कमी होतो..पनीर गाळून घ्या आणि स्वच्छ सूती कपड्यात घट्ट बांधा.हे बांधलेले पनीर 3-4 तासांसाठी जड वस्तूखाली किंवा भांड्यांखाली ठेवू शकता.आता घरी बनवलेले पनीर तयार आहे. वापरण्यापूर्वी एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या