पुढारी वृत्तसेवा
हिवाळ्यात धूळ, प्रदूषण आणि सूर्यप्रकाशामुळे त्वचेवर टॅनिंग होते. त्यामुळे मान, हात आणि पाय काळवंडलेले दिसू शकतात. अशा वेळी बाजारातील महागडी उत्पादने वापरण्याऐवजी काही जण घरगुती उपायांचा पर्याय निवडतात.
त्वचेवरील घाण स्वच्छ करण्यासाठी तुम्ही घरीच क्लींजिंग साबण तयार करू शकता. हा साबण बनवण्यासाठी काही साहित्याची गरज आहे. ही कृती इंस्टाग्रामवरील @beautifulyoutips या पेजवर शेअर करण्यात आली आहे.
साबण बनवण्यासाठी लागणारे साहित्य
१ स्किन ब्राइटनिंग सोप बेस
४ व्हाइटनिंग कॅप्सूल
२ ते ३ मोठे चमचे बटाट्याचा रस
१ मोठा चमचा मुलतानी माती
एक चिमूटभर हळद
१ मोठा चमचा कॉफी
लिंबाच्या रसाचे काही थेंब
साबण तयार करण्याची पहिली पायरी
सर्वप्रथम सोप बेसचे छोटे तुकडे करा. त्यानंतर डबल बॉयलर पद्धतीने तो वितळवून घ्या. सोप बेस पूर्णपणे वितळल्यानंतर त्यात व्हाइटनिंग कॅप्सूल घाला.
सर्व साहित्य एकत्र मिसळा
आता वितळलेल्या साबणात बटाट्याचा रस, मुलतानी माती, हळद, कॉफी आणि लिंबाचा रस घाला. हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र मिसळून घ्या. मिश्रणात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या.
साबणाला द्या हवा तसा आकार
तयार मिश्रण सिलिकॉन मोल्डमध्ये किंवा आवडीच्या भांड्यात ओता. काही तास ते तसेच थंड होण्यासाठी ठेवा. मिश्रण पूर्णपणे घट्ट झाल्यानंतर साबण मोल्डमधून बाहेर काढा.
साबणाचा वापर कसा करावा?
हा साबण अंघोळ करताना किंवा चेहरा धुताना वापरता येतो, असा दावा संबंधित पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
वापरताना घ्या ही काळजी
लिंबाचा रस आणि इतर घटकांमुळे काहींच्या त्वचेला जळजळ किंवा ॲलर्जी होऊ शकते. त्यामुळे हा साबण चेहऱ्यावर किंवा शरीरावर वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. संवेदनशील त्वचा असल्यास किंवा त्रास जाणवल्यास वापर टाळा.