पुढारी वृत्तसेवा
भूक लागत नसेल तर काही घरगुती उपाय करून पहा!
१) आल्याचा रस अर्धा चमचा आणि अर्धा चमचा मध दोन्ही वेळा जेवणानंतर घ्यावा.
२) एक चमचा जिरे, चिमूटबर हिंग, पाव चमचा काळे मीठ व चिमूटभर ओवा घेऊन सर्व अर्धा ग्लास पाण्यात मिसळून दिवसात दोन वेळा घ्यावे.
३) मेथी हिरवी भाजी पोटाला गारवा देणारी आणि भूकग वाढविणारी असते.
४) आरोग्यदायी टीप : जेवणाच्या वेळा निश्चित ठेवा. दिवसभरात पुरेसे पाणी प्या. सतत जंक फूड खाणे टाळा.
५) दररोज किमान १५-२० मिनिटे चाला किंवा वज्रासन, पवनमुक्तासन यांसारखी योगासने करा.
६) जेवणापूर्वी आल्याचा एक छोटा तुकडा लिंबाच्या रसात आणि सैंधव मिठात बुडवून खावा.