Dental Pain | दातदुखीवर करा 'हे' घरगुती उपाय; त्वरीत मिळेल आराम

अविनाश सुतार

दातदुखीवर पेरूची पाने चावावीत अथवा पेरूची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने चुळा भराव्यात

दातदुखीवर कच्च्या कांद्याचा तुकडा ठेवावा. आंबट पदार्थ खाल्ल्याने येणाऱ्या वेदना थांबून दात दुखणे कमी होते

एक ग्लास पाण्यात दोन चिमूटभर हिंग आणि एक चिमूटभर सैंधव घालून उकळून घ्या. या पाण्याने चुळा भरल्यास दातदुखीवर आराम मिळेल

चिमूटभर सैंधवमध्ये तिळाचे तेल घालून ही पेस्ट कीड लागलेल्या दाताला लावल्यास वेदना कमी होण्यास मदत होते

लसणाची एक पाकळी दाताखाली दाबून धरल्यास दातातून येणाऱ्या वेदना कमी होतात

दुखणाऱ्या दातावर बटाटा कापून त्याचे स्लाईस ठेवल्यास त्वरीत दुखणे बंद होण्यास मदत होईल

गरम पाण्यात टी बॅग्ज ठेवून तुमच्या दातदुखीच्या ठिकाणी शेक द्या, तीव्र वेदना कमी होतील

दुखऱ्या दातावर 20 ते 25 मिनिटांपर्यंत बर्फ ठेऊन शेक द्या, वेदनेपासून लवकरच सुटका होईल

दात दुखत असलेल्या ठिकाणी लिंबाचा थेंब सोडल्यास तत्काळ वेदना कमी होतील

येथे क्लिक करा.