white beard: दाढीचे केस अकाली पांढरे होत आहेत...? मग हे 5 घरगुती उपाय कराच

Anirudha Sankpal

पांढऱ्या केसांची कारणे

अनुवांशिकता, व्हिटॅमिनची कमतरता, वाढता ताणतणाव, धूम्रपान, अयोग्य आहार आणि रासायनिक उत्पादनांचा वापर यामुळे दाढीचे केस अकाली पांढरे होतात.

कढीपत्ता आणि खोबरेल तेल

कढीपत्ता खोबरेल तेलात गरम करून त्याने मसाज केल्यास केसांची मुळे मजबूत होतात आणि अकाली पांढरे झालेले केस कमी होण्यास मदत होते.

मऊ दाढीसाठी उपयुक्त

कढीपत्त्याच्या वापरामुळे दाढीचे केस मऊ आणि चमकदार दिसतात; हा उपाय आठवड्यातून २-३ वेळा करणे फायदेशीर ठरते.

आवळ्याचा वापर

आवळा पावडर खोबरेल तेलात मिसळून लावल्यास त्यातील व्हिटॅमिन-C मुळे 'ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस' कमी होतो आणि केसांच्या कूपांना (Follicles) पोषण मिळते.

काळ्या तिळाचे महत्त्व

रोज एक चमचा काळे तीळ गुळासोबत खाल्ल्याने शरीराला आवश्यक खनिजे मिळतात, जे केसांच्या नैसर्गिक रंगद्रव्याला (Pigmentation) आधार देतात.

संतुलित आहार

दाढीच्या आरोग्यासाठी आहारात अंडी, मोड आलेली कडधान्ये, सुकामेवा, दूध, डाळी आणि पालेभाज्यांचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे.

लोह आणि व्हिटॅमिन्स

पालक, बीट आणि फळांच्या सेवनामुळे रक्तातील लोहाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे केसांची वाढ निरोगी होते.

थायरॉईड आणि आरोग्य

थायरॉईडच्या समस्यांमुळेही केस पांढरे होऊ शकतात, त्यामुळे घरगुती उपायांसोबतच आरोग्याची नियमित तपासणी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

येथे क्लिक करा