Winter Cold Home tips: सर्दी-पडशावर १००% नैसर्गिक आणि घरगुती उपाय!

पुढारी वृत्तसेवा

वारंवार होणारी सर्दी आणि पडसे यामुळे अनेकजण त्रस्त असतात.

जर तुम्हालाही हा त्रास सतावत असेल, तर हे काही नैसर्गिक आणि पारंपरिक उपाय नक्की करून पहा.

रात्री जेवण झाल्यावर आणि झोपण्याच्या साधारण एक तास आधी १ ते १.५ ग्लास ताजे पाणी प्यावे. त्यानंतर झोपण्यापूर्वी १० मिनिटे आधी १०० ग्रॅम गूळ खावा.

गूळ खाल्ल्यानंतर अजिबात पाणी पिऊ नये. फक्त चूळ भरावी आणि झोपावे. यामुळे सकाळपर्यंत सर्दीमध्ये मोठा आराम मिळतो.

ज्यांना सारखी सर्दी होत असते अशांसाठी एक उत्तम उपाय.

गव्हाच्या पिठात थोडा गूळ टाकून ते कुटावे. त्यात थोडे तूप टाकून कणकेसारखे मळावे. याची जाड पोळी लाटून तव्यावर कापडाने दाबून कुरकुरीत शेकावी.

चांगली कुरमुरीत शेकुन झाल्यावर ताजी गरम खावी. त्यानंतर पाणी पिऊ नये.

ज्या दिवशी हा उपाय करायचा असेल त्या संध्याकाळी साधे हलके जेवण करावे, त्याआधी २-३ दिवस मसालेदार व तळलेल्या पदार्थांचे सेवन बंद करावे.

रोज सकाळी ७-८ तुळशीची पाने आणि २ काळी मिरी खाल्याने कधीच सर्दी पडसे होत नाही.