घरातून पालींना बाहेर काढण्यासाठी अंड्याच्या कवचांचा उपयोग होतो?

पुढारी वृत्तसेवा

घरात भिंतीवर सरसर फिरणारी पाल पाहून मोठी तसेच लहान मुलेही घाबरतात.

पालींना घरातून कसे बाहेर काढायचे हा अनेकांना प्रश्न पडतो.

पालीला घरातून बाहेर काढण्यासाठी अंड्याच्या कवचाचा वापर करता येतो.

पाल वारंवार ज्‍या ठिकाणी येते तिथे अंड्याचे कवच ठेवता येते.

दर दोन ते चार दिवसांनी हे कवच बदलावे लागते.

पालीला अंड्याच्या कवचाचा वास आवडत नाही, त्‍यामुळे त्‍या पुन्हा तिथे येत नाहीत.

पाल येणाऱ्या ठिकाणी चिरलेला कांदा किंवा लसणाची पाकळी अडकवली तरी पाल दूर राहते.

काळ्या मिरीच्या पावडरचे पाणी पाल येणाऱ्या ठिकाणी फवारावे. पाल वासाने पळून जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

येथे क्‍लिक करा