Namdev Gharal
साखर ही रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग, मुळात भारतात ऊसापासून शोध लागलेल्या या पांढऱ्या सोने अशी उपाधी मिळालेला साखर व त्याची बदलत गेलेली नावे खूपच इंटरेस्टींग इतिहास आहे
उसाचा रस उकळून त्यापासून खडे आणि साखर बनवण्याचा खरा शोध भारतात (गुप्त साम्राज्याच्या काळात, सुमारे इ.स. ३५० च्या आसपास) लागला. भारतात साखरेला इतके महत्त्व होते की तिला 'अमृत' मानले जायचे.
संस्कृतमध्ये बारीक वाळूच्या कणांना किंवा खड्यांना 'शर्करा ' (Sharkara) म्हणतात. उसाचा रस आटवून तयार केलेले स्फटिक (Crystals) वाळूच्या कणांसारखे दिसत असल्याने, या पदार्थाला 'शर्करा' हे नाव मिळाले.
शर्करावरूनच प्राकृतमध्ये 'सक्करा' (Sakkara) आणि मराठीत 'साखर' व हिंदी/उर्दूमध्ये 'शक्कर' हे शब्द आले. तर पुढे चीन देशात साखर शुद्ध करून ती पांढरीशुभ्र करण्याचे तंत्रज्ञान विकसीत झाले. म्हणून तिला 'चिनी' म्हणतात असे मानले जाते
भारतातील 'शर्करा' हा शब्द व्यापाराच्या माध्यमातून पर्शियामध्ये (इराण) गेला, तिथे त्याचा उच्चार 'शकर' (Shakar) असा झाला अरबीत त्याला 'सुक्कर' (Sukkar) म्हटले गेले.
पुढे अरबी व्यापाऱ्यांनी तो शब्द युरोपमध्ये नेला. तिथून इटालियनमध्ये 'झुक्केरो' (Zucchero), जुन्या फ्रेंचमध्ये 'सुकरे' (Sucre) आणि अखेरीस इंग्रजीत 'Sugar' (शुगर) हा शब्द रूढ झाला.
साखरेचे मुळ ऊसाचा शोध सुमारे ८,००० ते १०,००० वर्षांपूर्वी दक्षिण पॅसिफिक महासागरातील न्यू गिनी (New Guinea) बेटावर झाली. तिथले स्थानिक लोक उसाचा रस पिण्यासाठी ऊस चघळत असत.तेथून भारतात त्यापासून पांढरे क्रिस्टल तयार करण्याचा शोध लागला
१८ व्या शतकापर्यंत युरोपमध्ये साखरेला 'पांढरे सोने' म्हटले जायचे. श्रीमंत लोक आपली श्रीमंती दाखवण्यासाठी जेवणात भरपूर साखर वापरत असत. इंग्लंडची राणी एलिझाबेथ (पहिली) हिला साखर इतकी आवडायची की अतिसेवनामुळे तिचे दात काळे पडले होते.
इ.स.पू. ५१० मध्ये पर्शियन सम्राट दारियस (Darius) याने भारतावर स्वारी केली तेव्हा त्याने सिंधू नदीच्या काठावर ऊस पाहिला. त्याने याला "मधमाश्यांशिवाय मध देणारे गवत" असे संबोधले आणि त्याने ऊस पर्शियात नेला.
अलेक्झांडर द ग्रेट (सिकंदर) याचा सेनापती निआर्कस याने भारतातून परतताना साखरेचे वर्णन "गवतापासून बनणारे मध" असे केले. अशा प्रकारे युरोपला साखरेची पहिली ओळख झाली. ती इसवी सन पूर्व ३२७ मध्ये