Shawarma history : तुर्कस्तान ते भारत: लोकप्रिय स्ट्रीट फूड असलेल्या 'शोर्मा'ची रंजक कहाणी!

Namdev Gharal

शोर्मा (Shawarma) हा सध्या जगभरातील खवय्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला एक अत्यंत लोकप्रिय स्ट्रीट फूड प्रकार ठरला आहे.

खमंग भाजलेले मांस, मऊ लुसलुशीत ब्रेड आणि जिभेवर रेंगाळणारे सॉसेस यांचे हे मिश्रण अतिशय चविष्ट लागते. याचा काय आहे इतिहास पाहू

नाव कसे पडले

शोर्माचा उगम १९ व्या शतकात ओटोमन साम्राज्यात (आजचा तुर्कस्तान) झाला. याचे नाव पण शोर्मा हा मूळ शब्द तुर्की भाषेतील 'चेविर्मे' या शब्दाचे अरबी रूप आहे

याचा अर्थ होतो "फिरवणे" किंवा "घुटमळणे". उभ्या लोखंडी सळईवर मांस फिरवून भाजण्याच्या पद्धतीमुळे हे नाव पडले.

तुर्कस्तानमधील बुर्सा शहरात राहणारे कसाई 'मोहम्मद इस्कंदर एफेंदी' यांनी १८५० ते १८७० च्या दरम्यान सर्वात आधी मांस उभे ठेवून भाजण्याची ही पद्धत शोधून काढली. पुढे अरब देशांमध्ये 'शोर्मा'चा प्रसार झाला.

शोर्मा बनवण्याची खास पद्धत

मसाल्यांचे मॅरिनेशन: चिकन, मटणाचे पातळ काप करून ते लसूण, जिरे, कोथिंबीर, हळद, दालचिनी आणि वेलची अशा विविध मसाल्यांमध्ये रात्रभर मुरवले मॅरिनेट केले जातात.

हे मॅरिनेट केलेले मांस एका मोठ्या उभ्या सळईवर एकावर एक रचून शंकूच्या आकारात लावले जाते. ही सळई संथ गतीने आगीसमोर फिरते, ज्यामुळे मांसाचा बाहेरील भाग कुरकुरीत आणि आतील भाग Juicy राहतो.

जसा जसा मांसाचा बाहेरील थर भाजला जातो, तसा तो धारदार चाकूने अगदी पातळ खरवडून काढला जातो आणि ब्रेडमध्ये भरला जातो.

शोर्माचे प्रकार

चिकन शोर्मा (Chicken Shawarma): हा जगभरात आणि भारतात सर्वाधिक लोकप्रिय प्रकार आहे. यात रसाळ चिकनचे काप वापरले जातात.

मटण शोर्मा (Lamb Shawarma): हा मूळ पारंपारिक प्रकार आहे. मध्य पूर्वेतील (Middle East) देशांमध्ये हा मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. याचा स्वाद खूप गडद आणि खमंग असतो.

शाकाहारी खवय्यांसाठी मटणऐवजी 'फालाफेल' (चण्याची तळलेली वडी), पनीर किंवा मशरूम वापरून हा शोर्मा बनवला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.