Ganesh Idoal : कंबोडिया ते जपान : परदेशातील पुरातन गणेशमूर्ती!

Namdev Gharal

गणेश हे भारतीयांचे आराध्य दैवत, पण प्राचिन काळात गणेश दैवत भारताबाहेरही पोहचला होता भारताचाच भाग असलेल्या इंडोनेशिया, मलेशिया, याससह जपानमध्येही त्‍याचे पूजन केले जात होते, या देशांमधील काही प्रसिद्ध मूर्ती

इंडोनेशिया देशात माऊंट ब्रोमो या जावा बेटावरील एका सक्रिय ज्वालामुखीच्या टोकावर सुमारे ७०० वर्षे जुनी गणेश मूर्ती स्थापित आहे. स्थानिक तेंगरेसी लोक आजही ज्वालामुखीच्या उद्रेकापासून संरक्षणासाठी गणपतीची पूजा करतात.

इंडोनेशियातच असलेल्या ९ व्या शतकातील या प्रसिद्ध हिंदू मंदिर संकुलामध्ये प्रंबानन मंदिर (Prambanan) शिव मंदिराच्या एका कोनाड्यात भव्य आणि कलात्मक गणेश मूर्ती आहे.

कंबोडिया देशात प्रसात बाकेन व इतर मंदिरांमध्ये गणपतीला 'प्रह कोनेसा' (Prah Konesha) म्हटले जाते. येथील मूर्तींमध्ये गणपती सहसा उभ्या किंवा अत्यंत ध्यानस्थ मुद्रेत, स्थानिक खमेर कलाशैलीत कोरलेले दिसतात.

थायलंडमध्ये गणपतीला 'फ्रा फिकानेत' (Phra Phikanet) म्हणून ओळखले जाते आणि तेथे कला, विद्या आणि यशाचे प्रतीक मानले जाते.

थायलंडमध्ये लोपबुरी (Lopburi) आणि प्राचीन सखोल राजधानी सुखोथाई तसेच अयुथ्या (Ayutthaya) साम्राज्याच्या अवशेषांमध्ये १० व्या ते १४ व्या शतकातील कांस्य आणि दगडी गणेश मूर्ती सापडल्या आहेत.

जपानमध्ये गणपतीला बौद्ध परंपरेत 'कांगितेन' (Kangiten) किंवा 'शोतेन' (Shōten) म्हटले जाते. ८ व्या ते ९ व्या शतकात (हियान काळात) भारतातून बौद्ध धर्माद्वारे ही संकल्पना चीनमार्गे जपानमध्ये पोहोचली.

व्हिएतनाम (Vietnam) प्राचीन चंपा (Champa) साम्राज्यातील हिंदू राजांच्या काळात (विशेषतः ७ व्या ते १० व्या शतकात) माय सन मंदिर संकुलात कोरलेल्या अनेक पुरातन गणेश मूर्ती सापडल्या आहेत.

अफगाणिस्तानातील गर्देझ (Gardez) येथे ५ व्या शतकातील एक अत्यंत प्रसिद्ध संगमरवरी गणेश मूर्ती सापडली होती, ज्याला 'गर्देझ गणेश' म्हटले जाते. या मूर्तीवर ब्राह्मी लिपीत शिलालेखही कोरलेला आहे.