Namdev Gharal
सध्या मानवप्रजातीमध्ये वस्त्र ही अत्यंत प्रतिष्ठेची बाब झाली आहे यामध्ये पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळी फॅशन असली तरी शर्ट पॅन्ट हा आधुनिक युगाचा पेहराव झाला आहे
यामध्ये शर्ट पॅन्ट योग्य व सुलभरित्या परिधान करण्यासाठी बटन व काजे यांचे महत्व आहे.
याच बटनाचा इतिहास पाहिला तर याचे पुरावे ४,००० वर्षांपूर्वी सिंधू संस्कृतीत (Indus Valley Civilization) मिळतात. पण त्यावेळी ते फक्त सजावटीसाठी वापरले जात होते.
त्यानंतर सुमारे १२व्या–१३व्या शतकात युरोपमध्ये झाली. जर्मनी व फ्रान्समध्ये बटण आणि काजे सिलाई करून वापरणे लोकप्रिय झाले.
काजे (Buttonhole) म्हणजे कपड्यांवर करायचे छोटे छिद्र, ज्यात बटण अडकवता येते व शर्ट किंवा पॅन्ट शरिरावर फिट करता येते
शर्टला बटन लावने ही पद्धत १५व्या–१६व्या शतकात उदयास आली. हळू हळू याचा वापर वाढत गेला आणि नंतर हे “स्टँडर्ड” बनले.
काजांचा इतिहास पाहिला तर हे तंत्र मध्ययुगीन युरोपमध्ये विकसित झाल्याचे पूरावे आहे. बटणांबरोबरच काजे वापरायला सुरुवात झाली
पुर्वी बटण येण्यापूर्वीचे लोक ट्यूनिक (Tunic) अशा प्रकारचे सैलसर कपडे पुरुष घालत असत कापडाचा एक मोठा तुकडा, दोन बाजूंनी शिवलेला असे ज्यातून गळा डोकं सहज जात असे
त्यानंतर ड्रॉस्ट्रिंग (दोऱ्याने बांधायचे) lacing व नंतर बक्कलची पद्धत आली.