पुढारी वृत्तसेवा
उच्च कोलेस्टेरॉल म्हणजे, नावाप्रमाणेच, तुमच्या रक्तात कोलेस्टेरॉलची अतिरिक्त मात्रा असणे.
कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी तुमच्या रक्तवाहिन्या (धमण्या) अरुंद करू शकते, ज्यामुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि इतर अनेक आजारांचा धोका वाढतो.
आपलं शरीर कोलेस्टेरॉल वाढलंय हे आधीच सांगतं, फक्त संकेत ओळखावे लागतात. जाणून घ्या ती लक्षणं जी तुमचं हृदय आणि आरोग्य वाचवू शकतात.
डोळ्यांभोवती पिवळसर डाग – पहिला इशारा!
त्वचेवर किंवा डोळ्यांभोवती पिवळसर गाठी दिसतात का?
ही Xanthoma नावाची स्थिती असू शकते – शरीरात कोलेस्टेरॉल जमा झाल्याचं पहिले लक्षण.
डोळ्यांच्या बुबुळाभोवती पांढर वर्तुळ दिसलं तरीही तपासणी गरजेची!
छातीत दडपण, जळजळ किंवा वेदना – धोक्याची घंटा!
रक्तवाहिन्या अरुंद झाल्याने हृदयाला पुरेसं रक्त मिळत नाही. यामुळे Angina म्हणजेच छातीत दडपण किंवा जळजळ जाणवते. हे हृदयविकाराचा झटका येण्याआधीचं मोठं लक्षण आहे.
चालताना पायात दुखणं? लक्ष द्या!
कोलेस्टेरॉल वाढल्याने पायांच्या धमन्या बंद होतात. यामुळे चालताना पायात दुखणं किंवा जडपणा जाणवतो. ही Peripheral Artery Disease (PAD) ची लक्षणं असून ती दुर्लक्षित करू नका.
बोटं तळहाताकडे वाकू लागतात का?
Dupuytren’s Contracture या स्थितीत बोटांच्या स्नायूंमध्ये ताण येतो आणि बोटं हळूहळू वाकू लागतात. संशोधन सांगतं, उच्च कोलेस्टेरॉल असलेल्यांमध्ये हे विकार जास्त दिसतात.
थकवा आणि श्वास घेण्यास त्रास
धमन्या अरुंद झाल्याने शरीराला कमी ऑक्सिजन मिळतो. थोडं चाललं तरी दम लागतो, सतत थकल्यासारखं वाटतं. ही उच्च कोलेस्टेरॉलची गंभीर लक्षणं आहेत.
शरीर देत सिग्नल!
ही सर्व लक्षणं शरीर आधीच दाखवते, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. वेळेत तपासणी, योग्य आहार आणि व्यायाम हीच कोलेस्टेरॉलवरची खरी उपचारपद्धती आहे.
कोलेस्टेरॉल हा 'सायलेंट किलर' आहे. वेळेत काळजी घेतली तर हृदय, मेंदू आणि संपूर्ण आरोग्य सुरक्षित राहील.