Piles Causes: मूळव्याध होण्याची कारणे काय?

पुढारी वृत्तसेवा

मूळव्याध दोन प्रकारांमध्ये विभागला जातो. एका प्रकारात, मूळव्याध गुदद्वाराच्या आत विकसित होते. सुरुवातीला याचा कोणताही त्रास होत नाही; परंतु पुढील टप्प्यात रक्तस्राव किंवा वेदना जाणवू शकतात.

Piles | (Pudhari Photo)

दुसरा प्रकार म्हणजे, बाह्यरुपातील मूळव्याध. यामध्ये गुदद्वाराच्या बाहेर त्वचेखाली वेदनादायक गाठी जाणवतात.

जड अन्नाचे नियमित सेवन, आहारातील फायबर युक्त पदार्थांची कमतरता, कमी प्रमाणात पाणी पिणे, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, ताणतणाव यामुळे मूळव्याधीची समस्या उद्भवते.

सतत बसून राहिल्यास रक्ताभिसरण बिघडून मूळव्याध वाढू शकतो.

गर्भाशयाच्या वाढत्या दाबामुळे काही महिलांना मूळव्याध होऊ शकतो.

Ginger Use For Pregnant Women | file photo

अतिमसालेदार व जंक फूड हे पचनसंस्थेवर परिणाम करतात आणि मूळव्याधीची शक्यता बळावते.

गुदद्वाराच्या भागात वेदना होऊ लागल्यास, मलातून रक्तस्राव झाल्यास, या भागात जळजळ आणि खाज येत असल्यास, गुदद्वाराजवळ गाठी किंवा फुगलेल्या शिरा जाणवत असल्यास वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे ठरते.